पुणे : मोसमी पाऊस ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. सध्या उत्तर भारतात तापमान वाढले आहे. दक्षिण भारतात सुरू असलेला जोरदार पूर्वमोसमी पाऊस, दक्षिण चीन समुद्रातील ढग आणि वाऱ्यांची स्थिती, नैऋत्य आणि वायव्य हिंदी महासागरातील वाऱ्याची दिशा आणि वेग मोसमी पावसासाठी पोषक आहे. त्यामुळे नैऋत्य मोसमी पाऊस ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. अंदाज जाहीर केलेल्या दिवसापेक्षा चार दिवस कमी किंवा चार दिवस जास्त गृहित धरले जातात.
हेही वाचा : पिंपरी: पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात शरद पवार गटाचे आंदोलन
मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झालेल्या तारखा
२०१९ – ८ जून
२०२० – १ जून
२०२१ – ३ जून
२०२२ – २९ मे
२०२३ – ८ जून
२०२४ – ३१ मे (अंदाज)