पुणे : देशात तयार होणाऱ्या बिगर जणुकीय सुधारित तेलबियांच्या मोहरी, सोयाबीन, शेंगपेंडीला जगभरातून मागणी वाढली आहे. अमेरिका, युरोपसह आग्नेय आशियाई देशाला होणाऱ्या निर्यातीत ५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खाद्यतेल उद्योगाची शिखर संघटना असलेल्या द सॉलव्हंट एक्सट्रॅक्टर्स असोशिएन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, देशात तयार होणाऱ्या बिगर जणुकीय सुधारित तेलबियांच्या पेंडीला मागणी वाढली आहे. एप्रिल, मे २०२२च्या तुलनेत यंदाच्या एप्रिल, मे २०२३ मधील निर्यातीत ५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल, मे २०२३ मध्ये ९,३०,०४४ टन निर्यात झाली आहे. मागील वर्षी याच काळात ५,८६,४१५ टन निर्यात झाली होती. फक्त मे महिन्याचा विचार करता निर्यातीत ७२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मे २०२३ मध्ये ४,३६,५९६ टन निर्यात झाली आहे. मागील वर्षी म्हणजे मे २०२२ मध्ये २,५४,०६२ टन निर्यात झाली होती.

हेही वाचा – विदर्भात मुसळधार पाऊस पडणार?

देशांतर्गत बाजारात सोयाबीन पेंडीच्या दरात मोठी घट झाली आहे. एप्रिल २०२२ मध्ये प्रति क्विंटल ७६४० रुपये दर होता, तो यंदा ४९०० रुपयांवर आला आहे. देशांतर्गत बाजारातील दरात झालेल्या घसरणीमुळे खाद्यतेल उद्योगाकडून निर्यातीवर भर दिला जात आहे. १९ जून रोजी गुजरातच्या कांडला बंदरावरून निर्यात झालेल्या सोयाबीन पेंडीला ५९५ डॉलर प्रति टन दर मिळाला. आग्नेय आशिया सर्वात मोठा आयातदार ठरला आहे. बिगर जणुकीय सुधारीत (नॉन जीएम) सोयाबीन पेंडीला आग्नेय आशियासह युरोप आणि अमेरिकेतूनही चांगली मागणी आहे.

मोहरीच्या पेंडीचीही निर्यात वाढली

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये मोहरीच्या पेंडीची आजवरची उच्चांकी २२,९६,९४३ टन पेंडीची निर्यात झाली होती. निर्यातीचा हाच कल एप्रिल, मे २०२३ मध्येही कायम आहे. दोन महिन्यांत ४ लाख ८० हजार टन निर्यात झाली आहे. मागील वर्षी याच काळात ३ लाख ९८ हजार टन निर्यात झाली होती. मोहरीची पेंड दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, थायलंड आदी देशांना निर्यात झाली आहे.