उन्हाळ्यात सुट्यांमुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी रेल्वेत होते. त्यामुळे रेल्वेने उन्हाळ्यात सात विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. या गाड्या १२ एप्रिल ते १९ जून या कालावधीत सोडल्या जाणार असून, त्यांच्या एकूण ८८ फेऱ्या होणार आहेत.
पुणे ते दानापूर या साप्ताहिक गाडीच्या १४ फेऱ्या होणार आहेत. पुणे ते एर्नाकुलम या साप्ताहिक गाडीच्या १४ फेऱ्या होतील. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथूनही काही विशेष गाड्या सोडल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर या साप्ताहिक गाडीच्या दहा फेऱ्या होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मालदा या साप्ताहिक गाडीच्या दहा फेऱ्या होतील. लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी साप्ताहिक गाडीच्या १६ फेऱ्या होणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस ते बनारस या साप्ताहिक गाडीच्या १२ फेऱ्या होणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस ते समस्तीपूर या साप्ताहिक गाडीच्या १२ फेऱ्या होतील.
हेही वाचा >>>पुणे: पीएमआरडीएमधील मोठ्या गृहसंकुलांना ‘यूडीसीपीआर’ लागू
या विशेष गाड्यांसाठी ऑनलाइन तिकीट आरक्षण सुरू झालेले आहे. या गाड्यांच्या दुसऱ्या श्रेणीतील शयनयान कक्षाचे डबे अनारक्षित असणार आहेत. प्रवाशांना या गाड्यांतून प्रवास करताना करोनाविषयीच्या सर्व नियमांचे पालन करावे लागेल, असे रेल्वेच्या वतीने कळवण्यात आले आहे.