पुणे : शहर कचरा मुक्त करण्यासाठी ‘जनवाणी’ या संस्थेला पुणे शहर स्वच्छता मोहिमेत सक्रिय करण्याच्या मागणीवर जनवाणीने इंदूर शहराचा दौरा करावा, असे सुचविणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना इंदूरने स्वच्छतेचे धडे जनवाणीकडून गिरवल्याचे लक्षात आणून देण्यात आले. पुण्यातील जनवाणीकडून स्वच्छतेचे धडे गिरवणारे इंदूर शहर आज देशातील सर्वांत स्वच्छ शहर असा लौकिक राखून आहे, तर पुणे मात्र नवव्या स्थानावर गेल्याने रोजच्या कचरा समस्येला तोंड देत असल्याचे या निमित्ताने उघड झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : विश्लेषण : टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान धोकादायक संघ… पण जगज्जेतेपदाची संधी किती?

पुणे शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर येथे पदाधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेतली. या वेळी जनवाणीचे विश्वस्त आणि मराठा चेंबरचे माजी अध्यक्ष रवी पंडित यांनी जनवाणीच्या सक्रिय योगदानातून पुणे शहराने ८५ टक्केपर्यंत कचरा वर्गीकरणाचे उद्दिष्ट साध्य केल्याचे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेबरोबर कार्यरत असलेल्या जनवाणीला पुन्हा पुणे महापालिकेबरोबर काम करण्याची संधी मिळावी असा प्रस्तावही पंडित यांनी ठेवला. त्यावर जनवाणीने इंदूरचा दौरा करावा, असे चंद्रकांत पाटील यांनी सुचवले असता इंदूरने जनवाणीकडून स्वच्छतेचे धडे गिरवल्याचे पंडित यांनी अधोरेखित केले.

हेही वाचा : पर्यटकांची दिवाळीच्या सुट्टीत भटकंती; पर्यटन महामंडळाची निवासस्थाने ८५ टक्के आरक्षित

जनवाणी पुन्हा सक्रिय झाली असता वर्षाच्या आत पुणे शहरातील कचऱ्याचा प्रश्न नियंत्रणात येईल, असेही पंडित यांनी स्पष्ट केले. शहर स्वच्छतेच्या प्रश्नावर काम करण्यासाठी उद्योग आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी योगदान द्यावे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना पायाभूत सुविधा, हँडग्लोव्हज, गमबूट अशा सुविधा पुरवण्यात मदत करावी, असे आवाहन पाटील यांनी या वेळी केले.कचरा वर्गीकरण, कचरा जिरवणे याबाबत नागरिकांना पर्याय नको, तर सक्ती आणि कडक नियमांची अंमलबजावणी असावी, अशी मागणी नागरिकांच्या प्रतिनिधींकडून या वेळी करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indore city clean pune city garbage problem janwani chandrkant patil ravi pandit pune print news tmb 01