पिंपरी : इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी या नद्यांच्या प्रदूषणमुक्तीचे आराखडे तयार केले जात आहेत. नदीप्रदूषण मुक्तीचे काम लवकरच सुरू होईल. या तिन्ही नद्या प्रदूषणमुक्त करण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आळंदी येथे फ्रुटवाले धर्मशाळा येथे झालेल्या मारोती महाराज कुरेकर यांच्या ९३ व्या आणि रामराव महाराज ढोक यांच्या ७० व्या अभीष्टचिंतन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, खासदार श्रीरंग बारणे, म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव-पाटील, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदिपान महाराज शिंदे (हासेगावकर), संजय महाराज पाचपोर या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा – ऐन गणेशोत्सवात सीएनजी महागला! पुणे, पिंपरीतील बदललेले दर जाणून घ्या …

गड किल्ल्यांचा विकास, तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचे धोरण शासनाने हाती घेतले आहे. महाराष्ट्राला शेती, सिंचन, शिक्षण, उद्योग, आरोग्य, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आधुनिक बनविण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, की वारकरी संप्रदाय हा आपले संपूर्ण जीवन अर्पण करणारा; राज्याला, देशाला समाज प्रबोधनाची दिशा देणारा आहे. समाज घडविण्याचे काम वारकरी संप्रदाय करतो. संत परंपरा, वारकरी पंथ हे महाराष्ट्राचे वैभव आहे. राजकीय अधिष्ठानापेक्षा वारकरी पंथाचे आध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान मोठे आहे. धकाधकीच्या आयुष्यात पांडुरंगाचे नामस्मरण करताना चांगले विचार, चांगले कार्य करण्याचे विचार मनात येतात. मला काय मिळाले यापेक्षा दुसऱ्याला काय देणार हे महत्त्वाचे आहे. स्वत:साठी जगत असताना दुसऱ्याचे दु:ख वाटून घेण्याचे काम करणाऱ्यांपैकी वारकरी संप्रदाय आहे.

हेही वाचा – पुणे : गणेशोत्सवात मध्यभागात मद्यविक्री बंदीची कडक अंमलबजावणी, उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा

महाराष्ट्रात ५२ टक्के परदेशी गुंतवणूक

राज्य शासनाने बंद पडलेले प्रकल्प सुरू केले. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंक, अटल सेतू असे विकासाचे प्रकल्प राबविले. नवीन उद्योग आणले. महाराष्ट्र उद्योग, परदेशी गुंतवणुकीमध्ये आघाडीचे राज्य असून देशातील एकूणपैकी ५२ टक्के परदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.