पुणे : पावसाने ओढ दिल्याने मावळातील सुवासिक इंद्रायणी तांदळाच्या लागवडीत यंदा घट झाली आहे. उत्पादन कमी झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा इंद्रायणी तांदळाच्या भावात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो इंद्रायणी तांदळाचे भाव  ६० रुपयांपर्यंत आहेत. सुवासिक इंद्रायणी तांदळाला गेल्या काही वर्षांपासून मागणी वाढली आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा भागात इंद्रायणी तांदळाची लागवड केली जाते. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडयात बियाणांची लागवड केली जाते. यंदा पाऊस कमी झाल्याने इंद्रायणी तांदळाच्या लागवडीत घट झाली आहे, असे मावळ तालुक्यातील शेतकरी ज्ञानेश्वर ठाकर आणि भीमराव मोहोळ यांनी सांगितले.  २० ते २५ वर्षांपूर्वी इंद्रायणीचे वाण विकसित करण्यात आले होते. या वाणाची मुदत साधारपणे वीस वर्षांची होती. मात्र, त्यात बदल करून इंद्रायणीचे वाण विकसित करण्यात आले, असे त्यांनी नमूद केले.

harbhara farming
लोकशिवार: किफायतशीर हरभरा!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
farm distress maharashtra election
विधानसभा निवडणुकीत शेतीचे मुद्दे किती प्रभावी? राज्यातील शेतीची सद्यस्थिती काय?
MSP on agricultural produce
विश्लेषण : शेतमालाचे जाहीर हमीभाव शेतकऱ्याला प्रत्यक्षात मिळतात का?
Crops on 38 thousand hectares were hit by heavy rains Chandwad Deola and Peth suffered the most damage
मुसळधार पावसाचा ३८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका; चांदवड, देवळा, पेठमध्ये सर्वाधिक नुकसान
onion belt in maharashtra Mahayuti performance Asssembly Election
Onion Belt in Maharashtra: कांदा उत्पादक शेतकरी यावेळी भाजपाला पाठिंबा देणार? महायुतीची ‘ही’ रणनीती यशस्वी होईल?
Kolhapur rain paddy crops
Kolhapur Rain News: कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे पिकांना फटका
onion
सोलापुरात कांद्याची आवक वाढली; वाढीव सरासरी दरामध्ये घसरण

हेही वाचा >>> पुण्यातील एका कार्यकर्त्याचा असाही विक्रम…

हमी भाव देण्याची मागणी

वेल्हे तालुक्यातील राजगड, तोरणा, गुंजन मावळ भागातील शेतकऱ्यांनी इंद्रायणी तांदळाला ६५ ते ७० रुपये प्रतिकिलो भाव देण्याची मागणी केली आहे. नसरापूर आठवडे बाजारात काही शेतकरी कमी भावाने इंद्रायणी तांदळाची विक्री करतात. दरवर्षी शेतकऱ्यांकडून तांदूळ खरेदी करणारे व्यापारी भाव वाढवून देत नाहीत. लागवड खर्च, दैनंदिनी खर्चासाठी  शेतकऱ्यांनी पैशांची गरज असल्याने शेतकरी कमी भावाने तांदळाची विक्री करतात, असे वेल्हे तालुक्यातील शेतकऱ्यांनी सांगितले.

यंदा पावसाने ओढ दिल्याने लागवड कमी झाली. इंद्रायणी भातावर प्रक्रिया करुन त्याची विक्री केली जाते. काही मिलचालक थेट भात खरेदी करतात. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या वर्षांपासून शेतकऱ्याकडून भात (साळ) खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. साळीला प्रतिकिलोचा भाव २७ ते २८ रुपयांपर्यंत आहे.

– संताजी जाधव, कृषी अधिकारी, पंचायत समिती, वडगाव मावळ