पिंपरी : केंद्र सरकारच्या अमृत दोन अभियानामध्ये इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत ५२६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या शिफारशीनुसार कार्यवाही करावी, अशा सूचना राज्याच्या नगरविकास विभागाने दिल्याची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदी प्रदूषणाचा विषय चर्चेत आला आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने केंद्र सरकारपुरस्कृत अमृत २.० योजनेतील राज्य जलकृती आराखडा तयार केला. त्यामध्ये इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पाचा समावेश केला असून, ५२६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या शिखर समितीकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच, या प्रकल्पासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक मान्यता घेऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शासनास सादर करावे, असे आदेश नगरविकास मंत्रालयाने महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे निविदापूर्व प्रक्रियेला गती मिळाली आहे.

हेही वाचा – पुणे : …अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी! पत्नीने दिली होती सुपारी, केले होते २० ते २१ वार

हेही वाचा – पिंपरी : आता घराजवळच मिळणार वैद्यकीय उपचार, ४० ठिकाणी ‘आपला दवाखाना’

अमृत दोनच्या माध्यमातून नदीसुधार प्रकल्पाला निधी उपलब्ध होईल. पर्यावरण ना हरकत दाखला आणि केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आमदार लांडगे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indrayani will be pollution free central government has taken a big decision pune print news ggy 03 ssb