केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल, हे पंतप्रधान मोदी ठरवतील. मी केंद्रीय मंत्री असल्याने मी कशाला केंद्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहू, अशी मिश्किल टिप्पणी केंद्रीय केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- चिंचवडमध्ये शिवसेनेची बंडखोर राहुल कलाटेंविरोधात फ्लेक्सबाजी? कलाटे म्हणाले, “खरा शिवसैनिक..”

माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने मुक्तछंद, घे भरारी आणि देआसरा फाउंडेशन यांच्या वतीने उद्योजकांसाठी विनामूल्य परिसंवाद कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री राणे बोलत होते. पत्रकारांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल? या प्रश्नावर ते म्हणाले, की मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय पंतप्रधान मोदी घेतील. मी केंद्रीय मंत्री असल्याने मी या विस्ताराची वाट कशाला पाहू.

हेही वाचा- वर्षातले ३६५ दिवस काही जण धंदा म्हणून पाहतात; उद्योगमंत्री उदय सामंत यांची संजय राऊत यांच्यावर टीका

धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांनाच मिळेल. मी न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करत नाही. मात्र, ज्योतिष म्हणून सांगतो, की धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांनाच मिळेल. कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत राणे म्हणाले, की कसबा, चिंचवड या दोन्ही जागा मोठ्या मताधिक्याने भाजप जिंकेल. या निवडणुकांत विरोधकांचा सुपडासाफ होईल. भाजप हा ग्रामपंचायत ते संसदेपर्यंत सर्व प्रकारच्या निवडणुका गांभीर्याने घेऊन लढवतो. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात येत असतील.

हेही वाचा- चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणूक : माझ्या पक्षाला एकही जागा लढविता न आल्याने मी नाराज – सचिन अहिर

पंतप्रधान मोदी अलीकडेच दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर आले. त्याबाबत बोलताना राणे म्हणाले, की केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांचे लोकार्पण पंतप्रधान मोदीच करणार. त्यासाठी मोदी मुंबईत आले होते. आम्ही केलेल्या कामांचे लोकार्पण आम्हीच करणार, दुसरे कोण करणार? त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचा मुंबई दौरा आणि निवडणुका यांचा संबंध नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Industries minister narayan rane on cabinet expansion pune print news psg 17 dpj