पुणे : हिंजवडी आयटी पार्कमधील समस्या सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिले. विधानसभेच्या आचारसंहितेमुळे मंदावलेल्या कामांनी आता पुन्हा वेग घ्यावा, अशी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची अपेक्षा आहे. हिंजवडी परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपूल, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यांसारख्या पायाभूत सुविधांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जून महिन्यात बैठक घेऊन संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली होती. त्यांनी आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांची समस्या सोडविण्यासाठी आढावा बैठका घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले होते. त्यानंतर काही प्रस्तावांना गती मिळाली. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा वेग मंदावला होता.

हेही वाचा : पुणे : वाघोली अपघात प्रकरणात डंपर मालक अटकेत

women given special discounts by builders in thane
ठाण्यात बिल्डरांकडूनही लाडक्या बहिणींना विशेष सवलत; यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांचे स्टॉल
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
कोल्हापूर विमानतळाची भूसंपादन प्रक्रिया रखडली; सतेज पाटील, लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
chief minister devendra fadnavis appointment of ministers staff swearing ceremony
मंत्र्यांच्या शपथविधीला दीड महिना होऊनही कर्मचारी नियुक्ती प्रलंबित असल्याने अडचणी
आरएसएसचे कार्यकर्ते ठेवणार मंत्र्यांच्या 'कारभारा'वर लक्ष; महायुती सरकारमध्ये नेमकं घडतंय काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : आरएसएसचे कार्यकर्ते ठेवणार मंत्र्यांच्या ‘कारभारा’वर लक्ष; महायुती सरकारमध्ये नेमकं घडतंय काय?
Forest Minister Ganesh Naik Challenges
लोकजागर : नाईकांसमोरचे आव्हान!
Devendra Fadnavis in Davos while Shiv Sena voices frustration over Mahayuti's district guardianship dispute.
Shiv Sena : मुख्यमंत्री परदेशात असताना महायुतीतील तणाव वाढला, पालकमंत्रीपदावरून पडली ठिणगी; शिवसेनेच्या नाराजीची कारणे काय?
MLA Ravindra Chavan, Commissioner Dr. Indurani Jakhar and other officials.
डोंबिवली शहर विकासासाठी ६१ कोटीचा आराखडा, भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची कडोंमपा अधिकाऱ्यांबरोबर बैठक

या पार्श्वभूमीवर, उदय सामंत यांनी हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनबरोबर मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य अभियंता नितीन वानखेडे, प्रादेशिक अधिकारी अर्चना पठारे आणि विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत सामंत यांनी हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने मांडलेल्या १७ मुद्द्यांचा आढावा घेतला. त्यात आयटी पार्कमधील पर्यायी रस्ते, उड्डाणपूल, घनकचरा प्रकल्प यांचा प्रामुख्याने समावेश होता. यातील काही विषय मुख्यमंत्री कार्यालयाशी निगडित असल्याने त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही सामंत यांनी दिले.

पिंपरी-चिंचवडमधील समस्यांवरही चर्चा

पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील समस्यांवरही या बैठकीत चर्चा झाली. औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र आणि सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा प्रस्ताव प्रलंबित आहे, याकडे पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे संदीप बेलसरे यांनी लक्ष वेधले. यावर उद्योगमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांना हे दोन्ही प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.

हेही वाचा : पुण्यासाठी दोन महापालिका आवश्यक, निर्णयासाठी उशीर चालणार नसल्याची चंद्रकांत पाटील यांची भूमिका

हिंजवडी आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांचा मुद्दा खूप काळापासून प्रलंबित आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासह इतर अनेक मुद्दे आम्ही मांडले होते. याबाबत उद्योगमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा केली. पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांना दिले.

शंकर सालकर, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हिंजवडी आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांचे निर्णय प्रलंबित होते. उद्योगमंत्र्यांनी याचा आढावा घेऊन संबंधित विभागांना त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. याचबरोबर पायाभूत सुविधा उभारणीतील तांत्रिक अडथळे दूर करण्याचे निर्देशही दिले आहेत.

अर्चना पठारे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

Story img Loader