लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे : आवक कमी झाल्याने कोंबी, फ्लॉवर, हिरवी मिरची, शेवगा, गाजर, घेवडा, ढोबळी मिरची, मटारच्या दरात वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (१३ ऑक्टोबर) राज्य, तसेच परराज्यातून मिळून ७५ ते ८० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्यात झालेला पाऊस आणि दसऱ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून ७ ते ८ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ३ ते ४ टेम्पो कोबी, कर्नाटकातून २ ते ३ टेम्पो पावटा, कर्नाटक आणि गुजरातमधून २ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून २ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातील इंदूर भागातून ४ ते ५ टेम्पो गाजर, कर्नाटक, गुजरातमधून ४ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून ७ ते ८ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

आणखी वाचा-एमपीएससीकडून सहायक कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; अवधूर दरेकर राज्यात प्रथम

पुणे विभागातून सातारी आले ४०० ते ५०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो साडेपाच ते सहा हजार पेटी, हिरवी मिरची २ ते ३ टेम्पो, ढोबळी मिरची ७ ते ८ टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई, सातारा परिसरातून मटार ४० ते ५० गोणी, काकडी ८ ते १० टेम्पो, कोबी २ ते ३ टेम्पो, फ्लाॅवर २ ते ३ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा ७० ते ७५ ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ३५ ते ४० टेम्पो बटाट्याची आवक झाली.

मेथी, शेपू, कांदापात, करडईच्या दरात वाढ

मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, करडई, चुका, चवळई या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली. राजगिऱ्याच्या दरात घट झाली असून, कोथिंबिर, पुदीना, अंबाडी, मुळे, पालक या पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबीर दीड लाख जुडी, तसेच मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- १००० ते १५००, मेथी – १५०० ते २०००, शेपू – १००० ते १५००, कांदापात- १५०० ते १८००, चाकवत – ४०० ते ८००, करडई- ५०० ते ८००, पुदिना – ५०० ते ८००, अंबाडी – ४०० ते ७००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा- ४०० ते ७००, चुका – ६०० ते १०००, चवळई- ४००-८००, पालक- १२००-१५००.

आणखी वाचा-पुणे : ताटात हात घातल्याने तरुणाचा खून, धायरीतील घटना; पाचजणांविरुद्ध गुन्हा

मोसंबी, पपई, चिकूच्या दरात वाढ

मोसंबी, पपई, चिकूच्या दरात वाढ झाली. पेरुच्या दरात घट झाली असून, डाळिंब, संत्री, कलिंगड, खरबूज, सीताफळाचे दर स्थिर असल्याची माहिती फळबजारातील व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी मोसंबी ४० ते ५० टन, संत्री ८ ते १० टन, डाळिंब १० ते १५ टन, पपई १५ ते २० टेम्पो, लिंबे आठशे ते एक हजार गोणी, कलिंगड ७ ते ८ टेम्पो, खरबूज ३ ते ४ टेम्पो, चिकू एक हजार गोणी, पेरू २०० प्लास्टिक जाळी (क्रेट), अननस ४ ट्रक, सीतापळ २० ते २५ टन अशी आवक झाली.