लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे: सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत राज्यात सुरू असलेल्या रस्ते, इमारत बांधकाम आदी कामांची सद्य:स्थिती नागरिकांना ऑनलाइन माध्यमातून पाहता येणार आहे. तसेच कामांबाबत काही तक्रारी असल्यास मोबाइलवरून त्या पाठवताही येणार आहेत. याबाबतची संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात पारदर्शकता येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत पुणे प्रादेशिक विभागाची आढावा बैठक सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी ही माहिती दिली.
आणखी वाचा- महाराष्ट्र दिनापासून जिल्ह्यात ‘कचरामुक्त अभियान’
ते म्हणाले, की विभागाकडून प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (पीएमआयएस) ही संगणकप्रणाली तयार करण्यात आली आहे. या संगणकप्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रकल्पांची सद्य:स्थिती समजणार आहे. राज्यात एक लाख पाच हजार किलोमीटरचे रस्ते, ३३ हजार ४०० इमारती, पूल आदी मत्ता निर्माण झाली आहे. त्याची माहिती या प्रणालीवर भरण्यात आली असून या कामांची देखभाल दुरुस्ती आणि नवीन कामांचे संनियंत्रण या प्रणालीद्वारे करण्यात येत आहे.
दरम्यान, केंद्र शासनाच्या ‘एम-सेवा’ उपयोजनमध्ये (ॲप) नागरिकांना महामार्गांवरील खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी राज्याच्या बांधकाम विभागाने तयार केलेल्या पॉटहोल कंप्लेंट रिद्रेड्रेसल सिस्टीम (पीसीआरएस) उपयोजनची सुविधा देण्यात आली आहे. लवकरच हे उपयोजन गुगल प्ले-स्टोअरवरही उपलब्ध होणार आहे. त्यावर नागरिकांना आपले अभिप्राय, सूचना, तक्रारी देता येतील. नागरिकांच्या तक्रारीची माहिती संबंधित अभियंत्याला जाईल आणि त्यानुसार रस्त्यावरील खड्डे भरणे आदी कामे विहित वेळेत करून दुरुस्तीचे छायाचित्र अपलोड करून संबंधित नागरिकाला संदेशाद्वारे कळविण्यात येईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.