वैद्यकीय व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान प्रणालीच्या सहाय्याने आरोग्य सेवेचे संगणकीकरण करण्यात येणार असून त्याअंतर्गत रुग्णांना पूर्वी झालेल्या आजारावर काय उपचार करण्यात आले आहेत, याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.महापालिका आणि पुणे स्मार्ट सिटीच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान प्रणालीची अंमलबजावणी महापािलकेच्या एकूण ७९ रुग्णालये, दवाखाने, प्रसुती वाॅर्ड आणि महापालिका वैद्यकीय महाविद्यालात सुरू करण्यात आली आहे. आरोग्य सेवेचे संगणकीकरण करणे हा या प्रणालीचा मुख्य उद्देश असून डाॅक्टर्स आणि रुग्णांचा वेळही या प्रणालीमुळे वाचणार असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>पुणे: वैमनस्यातून तरुणावर टोळक्याकडून हल्ला; मुंढव्यातील घटना
रुग्णांना करण्यात येणाऱ्या उपचाराबरोबरच अन्य सर्व विभाग, बाह्यरुग्ण विभाग, प्रयोगशाळा, औषधालय क्षेत्रात बदल करण्याचे नियोजित आहे. या मोहिमेत पुणे स्मार्ट सिटीतर्फे ३०० टॅब्ज्चे वितरण डाॅक्टरांना तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांना करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कमला नेहरू रुग्णालय आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ४६ टॅब्जचे वितरण करण्यात आले आहे.