राज्यातील शाळांमध्ये संगणक प्रशिक्षणासाठी आखण्यात आलेल्या आयसीटी योजनेचा दुसरा टप्पा संपल्याने माहिती तंत्रज्ञान विषय शिकवणाऱ्या अडीच हजार प्रशिक्षकांवर बेरोजगारीची वेळ आल्याचा दावा या प्रशिक्षकांच्या संघटनेने केला आहे. शिक्षकांनी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. राज्यातील शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा उभारणे आणि माहिती तंत्रज्ञान विषयाचे शिक्षण सुरू करणे यासाठी शासनाने आयसीटी योजना आखली. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने खासगी कंपन्यांबरोबर करार केला. या योजनेअंतर्गत आता ८ हजार प्रशिक्षक काम करत आहे. या योजनेचा दुसरा टप्पा महिना अखेरीस संपणार आहे. त्यामुळे या कंपन्यांबरोबरचे करारही संपणार असल्यामुळे अडीच हजार प्रशिक्षकांचे काम जाणार असल्याचा दावा संघटनेने केला आहे. नियमित सेवेत रुजू करून घ्यावे या मागणीसाठी या प्रशिक्षकांनी ‘महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघ’ स्थापन केला असून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.

Story img Loader