इन्फोसिसची नोंदणी मुंबईत झाली तरी खऱ्या अर्थाने इन्फोसिसच्या कामाची सुरुवात पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमधील दोन खोल्यांमध्ये झाली. त्यामुळे इन्फोसिस हे खऱ्या अर्थाने पुण्याचे बाळ आहे, अशी भावना इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी सोमवारी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पुणे : नाना पेठेत तरुणाचा खून करणाऱ्या गुंड टोळीवर ‘मोक्का’

हेही वाचा – बारामतीतील चांदगुडेवाडीत वाळू माफियांवर कारवाई, कऱ्हा नदीपात्रात वाळू उपसा

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या ‘मनन’ या महोत्सवात नारायण मूर्ती यांनी ऑनलाइन सहभाग घेतला. संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांनी मूर्ती यांच्याशी संवाद साधला. इन्फोसिसची नोंदणी झाली. मात्र, इमारतीचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे प्रोफेसर कृष्णय्या यांनी गोखले संस्थेचे तत्कालीन संचालक डॉ. वि. म. दांडेकर यांना आम्हाला काही मदत करण्याबाबत सांगितले. त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या दोन खोल्यांमध्ये इन्फोसिस सुरू झाली. वैशाली, रुपाली आणि फर्ग्युसन रोड ही त्या काळातही लोकप्रिय ठिकाणे होती, असेही मूर्ती यावेळी म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Infosys is the baby of pune feelings of narayan murthy pune print news bbb 19 ssb