डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातील (बीएमसीसी) पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन शिष्यवृत्ती योजना सुरू करणारे बीएमसीसी हे देशातील पहिलेच महाविद्यालय असल्याचा दावा महाविद्यालयाने केला. बीएमसीसीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
बळवंत गुळणीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या निधीच्या व्याजातून पदवीच्या विद्यार्थ्यांना संशोधन शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी ‘संशोधन कार्यपद्धती’ या विषयातील दोन श्रेयांकांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. दरवर्षी दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल. डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपप्राचार्य डॉ. आशिष पुराणिक, सनदी लेखापाल अभिजीत गुळणीकर, डॉ. वसुधा गर्दे, डॉ. प्रशांत साठे यांच्य उपस्थितीत योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
हेही वाचा – गणेश जयंतीनिमित्त उद्या पुण्याच्या मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल
हेही वाचा – पुणे : व्हॉट्सअॅपवरील संदेशावरून झालेल्या वादात बांधकाम व्यावसायिकाकडून तरुणावर गोळीबार
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये समाजोपयोगी संशोधन करण्याच्या क्षमता असतात. त्यामुळे योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधनासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ दिले जाणार असल्याचे डॉ. कुंटे यांनी सांगितले.