प्रदर्शन म्हणजे विविध उत्पादने पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी आणि त्यातही खाण्या-पिण्याची रेलचेल असे चित्र सामान्यपणे आपल्या डोळ्यांसमोर येते. पण याला संपूर्णपणे अपवाद असणारे एक प्रदर्शन भरते, जेथे समाजोपयोगी विविध संस्था त्यांच्या कामाची माहिती जनमानसात पोहचवतात. त्यांचे कार्य आवडून जर कोणी देणगी दिली, तर ती घेतात; पण त्यासाठी कोणताही अट्टहास किंवा लाचारीने कोणाच्या मागे लागणे नाही. ‘आर्टिस्ट्री’ संस्थेमार्फत राबवला जाणारा देणे समाजाचे हाच तो उपक्रम, जो यंदा विसाव्या वर्षात पदार्पण करतोय आणि दर वर्षी विविध क्षेत्रांत सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना आपले कार्य मांडण्याची संधी देतोय. केवळ प्रामाणिकपणे आणि पूर्णपणे सामाजिक कार्याला वाहून घेतलेली संस्था या उपक्रमात सहभागी होऊ शकते, अर्थातच निवड चाचणीच्या निकषांमध्ये स्वतःचे काम सिद्ध करून. या संस्थांची निवड करण्यासाठी जागृत असतात, त्या ‘आर्टिस्ट्री’च्या अध्यक्षा वीणा गोखले.

दर वर्षी पितृपंधरवड्याच्या कालावधीत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते आणि दिव्यांग, एचआयव्हीबाधित, परित्यक्ता, आदिवासी, कर्करुग्णग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, ज्येष्ठ नागरिक, निराधार, भिक्षेकरी, ऊसतोडणी मजूर आदी विविध क्षेत्रांत महाराष्ट्रभर सातत्याने काही वर्षे कार्य करणाऱ्या संस्थांचे काम माहिती करून घेण्याची संधी मिळते. काही दाते त्यांच्या आवडीने आणि त्यांना हवी तेवढी देणगी या संस्थांना देतात. देणगीदार आणि संस्थांना जोडणारा दुवा म्हणून या प्रदर्शनाचे कार्य सुरू आहे. दर वर्षी २५ संस्थांना प्रदर्शनात सहभागाची संधी दिली जाते. दहा फूट बाय सहा फूट आकाराचा स्टाॅल – वीज, टेबल, खुर्च्यांसह सुसज्ज असलेला – दिला जातो, तोही कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता, हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य.

PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
Gaitonde
कलाकारण: बाजारप्रणीत इतिहासाच्या पलीकडले गायतोंडे
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !
Thane district, 578 children came under education stream, Survey of out of school children
ठाणे जिल्ह्यातील ५७८ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात
prime minister internship scheme
‘PM Internship Scheme’ काय आहे? योजनेसाठी पात्रता काय? बेरोजगार तरुणांना या योजनेचा कसा मिळणार लाभ?

हेही वाचा – गुंगीचे इंजेक्शन देऊन शाळकरी मुलीवर अत्याचार; शाळेतील तक्रार पेटीमुळे अत्याचाराला वाचा

पुण्यातील हे प्रदर्शन वर्षातून एकदाच असले, तरी वर्षभरात पुण्याबाहेर ठाणे, विलेपार्ले, मुलुंडसारख्या ठिकाणीदेखील या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. वर्षभरात थोड्या थोड्या कालावधीसाठी ठिकठिकाणी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असले, तरी या प्रदर्शनाच्या निमित्ताने वीणा गोखले यांचे सामाजिक कार्य वर्षभर सुरूच असते. विविध सामाजिक संस्थांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्या सातत्याने संपर्कात असतात. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या आणि होऊन गेलेल्या संस्थेच्या कार्याचा लेखाजोखा त्यांच्याकडे असतो. प्रदर्शनाच्या निमित्ताने निवड करण्यापासून संस्था जोडली गेली, तरीही त्या दुर्मीळ भागातील वाड्या-वस्त्यांवर असलेल्या सेवाभावी संस्थांना भेट देण्यात व्यग्र असतात. विविध संस्थांना भेडसावणारे प्रश्न, त्यांच्या गरजा, अडचणी त्या जाणून घेतात. त्यातून कोणत्या संस्थेला प्रदर्शनात सहभागी होण्यास संधी द्यायची हे जसे ठरवले जाते, तसेच संस्थेच्या योग्य व्यक्ती, तसेच देणगीदार जोडून देण्याचे कार्य त्या वर्षभर करीत असतात. समाजातील दानशूरांना समाजोपयोगी संस्था निवडीची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच सामाजिक संस्थांच्या कार्याला उभारी देणाऱ्या या ‘देणे समाजाचे’ या प्रदर्शनाची मुहूर्तमेढ पुण्यातूनच रोवली गेली ही पुणेकरांसाठी नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. चोखंदळ पुणेकरांनीही पुढे येत या कार्यात तन-मन-धनाने हातभार लावला. या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रदर्शनामुळे संस्थांना केवळ आर्थिक स्वरूपातच देणगी मिळते असे नाही, तर मनुष्यबळविकसन, भौतिक मदतीच्या कार्यातही अनेक दाते प्रत्यक्ष सहभागातून हातभार लावतात. याचा लाभ आजपर्यंत या प्रदर्शनात सहभागी झालेल्या मुरबाड, चिपळूण, नाशिक, अमरावती आदी ठिकाणच्या सामाजिक संस्थांनी घेतला आहे.

‘देणे समाजाचे’ या उपक्रमाच्या माध्यमातून सेवाभावी संस्थांना मदत कशी होते, याचे एक उदाहरण पाहायचे झाले, तर बीडमधील एका सामाजिक संस्थेत जेथे तमासगीरांच्या मुला-मुलींचा सांभाळ केला जातो, तेथे योग्य आणि पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध नव्हती. एका देणगीदाराशी बोलून त्यांनी साडेपाच लाख रुपये या कामासाठी उभे केले. इतकेच नाही, तर ‘देणे समाजाचे’ प्रदर्शन आयोजित करण्याची सगळी तयारी झाली असताना आलेल्या आर्थिक अडचणींवरदेखील देणगीदारांच्या साहाय्याने मात करता येणे शक्य झाले आहे. हे सगळे कार्य वीणा गोखले केवळ देणगीदारांच्या आर्थिक मदतीतूनच करतात असे नव्हे, तर त्यासाठी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून मिळालेल्या नफ्यातील काही हिस्सादेखील वापरला जातो, हेही तितकेच महत्त्वाचे!

हेही वाचा – पुणे : शहरात चंदन चोरट्यांचा धुमाकूळ- लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यात चंदन चोरी

यंदाच्या वर्षी या प्रदर्शनाची नेहमीची जागा जरी बदलली असली, तरी तेवढ्याच दिमाखात या प्रदर्शनात वैविध्यपूर्ण आणि तितक्याच सचोटीने कार्य करणाऱ्या संस्थांचे कार्य जाणून घेता येईल. येत्या आठवड्यात २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत नवी पेठेतील ‘निवारा सभागृह’ येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता निवारा सभागृहात प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, डाॅ. संजय उपाध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या वर्षीही २४ सामाजिक संस्थांचे कार्य या प्रदर्शनाच्या निमित्ताने समजून घेता येईल आणि दातृत्वाचा हात पुढे करता येऊ शकेल.

shriram.oak@expressindia.com