लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : घेरा सिंहगड परिसरातील सांबरेवाडीमध्ये दोन गटात झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हाणामारीत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

minor boy died in a collision with a motor vehicle in Dahisar
दहिसर येथे मोटरगाडीच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा मृत्यू
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Two died in an accident in Nashik district
नाशिक जिल्ह्यात अपघातात दोघांचा मृत्यू, एक जखमी
Three friends drowned Buldhana
बुलढाणा : पोहोताना तिघे मित्र बुडाले! दोघे बचावले, एकाचा मृत्यू
Mumbai, person two-wheeler died,
मुंबई : मोटरगाडीच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू, दोघे जखमी
Lalbaug Accident, Datta Shinde Arrested
Lalbaug accident : लालबाग अपघात आणि नुपूर मणियारच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेला मद्यधुंद आरोपी दत्ता शिंदे अटकेत
Noel Tekkekara of Navi Mumbai died by drowned in Devsu
नवी मुंबईतील नोएल तेक्केकारा यांचा देवसूमध्ये बुडून मृत्यू
accident in Goregaon, two-wheeler accident Goregaon,
गोरेगावमध्ये दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू

सांबरेवाडीमध्ये वर्चस्वाच्या वादातून शनिवारी (१४ सप्टेंबर) मध्यरात्री दोन गटामध्ये हाणामारी झाली. त्यावेळी दोन्ही गटांकडून पिस्तुले, कोयते, तसेच तलवारीचा वापर करण्यात आला. या घटनेत रोहित उर्फ भोऱ्या धर्मेंद्र ढिले (वय २२, रा. सांबरेवाडी, सिंहगड) याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यात सोमनाथ अनंत वाघ (वय २४, रा. सांबरेवाडी ) गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. हाणामारीत दोन तरुणांचे खून झाल्याने सांबारेवाडीत मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आणखी वाचा-Nitin Gadkari : “राजाने विरोधी विचार सहन केले पाहिजेत हीच लोकशाहीची परीक्षा”, नितीन गडकरींचा रोख कुणाकडे?

या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, सशस्त्र मारामारीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंगेश उर्फ मुन्ना मोहन दारवटकर (वय २५, रा. कोंडगाव, ता. हवेली), वैभव उर्फ सोन्या शिवाजी जागडे (वय २०), सिद्धेश राजेंद्र पासलकर (वय २५, दोघे रा. आंबेड, ता. वेल्हा), प्रथमेश उर्फ भावड्या मारुती जावळकर (वय १८), सुमित उर्फ दाद्या किरण सपकाळ (वय २०), केतन उर्फ दाद्या नारायण जावळकर (वय २३), वैभव किशोर पवार (वय १८), तेजस चंद्रकांत वाघ (वय २४, सर्व रा. खानापूर, ता. हवेली) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

घेरा सिंहगड परिसरातील सांबरेवाडीमध्ये वर्चस्वातून तेजस वाघ आणि रोहित ढिले यांच्यात वर्चस्वाच्या वादातून सुुरू होते. त्यातून रोहितने तेजसला जिवे मारण्याची धमकी देऊन खानापूर चौकात बोलावले. तेजस त्याचे मित्र मंगेश दारवटकर, वैभव जागडे, संग्राम वाघ, सिद्धेश पासलकर, स्वप्नील चव्हाण, केतन जावळकर, गणेश जावळकर, प्रथमेश जावळकर, सोमनाथ वाघ, आकाश वाघ, सुमित सपकाळ, वैभव पवार यांना घेऊन खानापूर चौकात गेला. त्यावेळी दोन्ही गटात हाणामारी झाली. त्यात रोहित जागीच मरण पावला. मारामारीत पिस्तुलाच्या दोन गोळ्या लागल्याने सोमनाथ गंभीर जखमी झाला होता.