पिंपरी-चिंचवडमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीने शाई फेकली आहे. चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे अवघ्या राज्यात विरोधक आक्रमक झाले होते. आज सकाळीच पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध पक्षांनी एकत्र येऊन आंदोलन करत पाटील यांचा निषेध केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान , आज दुपारी ते पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यक्रमासाठी येणार होते. त्यासाठी शेकडो पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चिंचवडमधील भाजपा पदाधिकारी मोरेश्वर शेंडगे यांच्या घरी ते चहा पिण्यासाठी थांबले होते. चहानंतर ते पुढील कार्यक्रमासाठी निघाले असता त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकली.

हेही वाचा- चंद्रकांत पाटलांवर शाईफेकीच्या घटनेवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया, ‘यामागे कोणाचा मेंदू…’

संबंधित व्यक्तीने थेट तोंडावर शाई फेकल्याने चंद्रकांत पाटलांचा समतोल बिघडला, हे जमिनीवर पडता-पडता थोडक्यात बचावले. हा प्रकार घडताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला पकडलं आहे. यावेळी संबंधित व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच ‘बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणाही संबंधित व्यक्तीने दिल्या.

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक झालेला VIDEO:

दुसरीकडे, उद्धव ठाकरे शिवसेना गटानेदेखील कार्यक्रमाच्या स्थळाच्या जवळच आंदोलन करत चंद्रकांत पाटील यांचा निषेध व्यक्त केला. पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ink throw at bjp leader chandrakant patil in pune pimpri chinchwad rmm