पुणे / पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून दोन स्वतंत्र आराखडे करण्यात आले आहेत. त्यानुसार मुळा नदीच्या उजव्या बाजूकडील नदीकाठाचे विकसन पुणे महापालिका ‘क्रेडीट नोट’द्वारे तर पिंपरी-चिंचवड महापालिका डाव्या बाजूच्या नदीकाठाचे ‘रोखी’ने विकसन करणार आहे. पुणे महापालिकेने त्याबाबतची ३०० कोटींची निविदा प्रक्रिया राबविली असून नदीकाठच्या दोन्ही बाजूकडील आठ किलोमीटर अंतराचे संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेअंतर्गत या दोन्ही शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीचा काठाचे विकसन करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रारंभी ६०० कोटींची संयुक्त निविदा राबविली होती. मात्र आर्थिक आराखड्यावरून एकमत न झाल्याने या दोन्ही महापालिकांनी त्यांच्या हद्दीतून वाहणाऱ्या नदीकाठचा स्वतंत्रपणे विकास करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार पुणे महापालिकेने ३०० कोटींची निविदा प्रक्रिया राबविली आहे. मात्र एकाच नदीचा दोन स्वतंत्र आर्थिक आराखड्यानुसार विकास होणार आहे.
वाकड बाह्यवळण ते स्पायसर कॉलेज-सांगवी पूल असे डाव्या बाजूचे ८.८० किलोमीटर अंतराचे काम पिंपरी महापालिका करणार आहे. तर, उजव्या बाजूचे काम पुणे महापालिका करणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिचंवड शहाराच्या हद्दीतून मुळा नदी वाहते. दोन्ही महापालिका हद्दीत या नदीची एकूण लांबी ४४.४० किलोमीटर इतकी आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत मुळा नदीच्या काठाची लांबी सुमारे १४.२० किलोमीटर इतकी आहे. या भागात पिंपळे-निलख येथील डिफेन्स लॅण्ड आणि दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (सीएमई) अंतर्भाव आहे.
या पूर्ण नदीचा बहुतांश भाग पुणे महापालिका हद्दीत येत असल्याने या पूर्ण नदीचे पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम पुणे महापालिकेसोबत संयुक्तरीत्या करण्याचे ठरले होते. एकत्रित निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने पुणे महापालिका हद्दीतील भाग एकसाठी ३०४ कोटी आणि पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील पहिल्या टप्प्यातील ८.८० किलोमीटर लांबीच्या भाग एकसाठी ३२१ कोटीच्या कामाचा समावेश करण्यात आला. त्यानुसार, ऑक्टोबर महिन्यात दोन्ही महापालिकांतर्फे ६२४ कोटी ७६ लाख ६६ हजार रुपये खर्चाची संयुक्त निविदा मागविण्यात आली.
महापालिकेच्या भूमिका वेगवेगळ्या
पुणे महापालिकेला ही कामे क्रेडिट नोटवर करायची होती. तर, पिंपरी – चिंचवड महापालिकेला हे काम रोख मोबदल्याने करायचे होते. त्यामुळे क्रेडिट नोट की रोख मोबदला या वादात संयुक्त निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दोन्ही महापालिकांनी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविली. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नदीच्या पुनरुज्जीवनासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली. पहिल्या टप्याचे २७६ कोटी ५४ लाख काम बी.जी.शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आले. वाकड बायपास ते स्पायसर कॉलेज-सांगवी पूल असे ८.८० किलोमीटर अंतराचे काम हाती घेण्यात येणार आहे. कार्यारंभ आदेश दिला नसल्याने काम सुरू झाले नाही.
पुणे महापालिकेकडून ३०३ कोटींची निविदा
पुणे महापालिकेनेही ३०३ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महापालिकेने बंडगार्डन ते संगमावाडी या टप्प्यातील कामे सुरू केली आहेत. त्यापैकी तीनशे मीटर अंतरातील काम पूर्ण झाले आहे. सार्वजनिक खासगी लोकसहभाग, विकसकाला क्रेडिट नोट आदी पर्यायांद्वारे पुणे महापालिकेने कामे निश्चित केली आहेत. संगमवाडी-बंडगार्डन आणि बंडगार्डन-मुंढवा पुलासाठी दोन कंत्राटदारांना ७०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. यापैकी पुणे महापालिका जयकुमार कंपनीला ४०० कोटींची क्रेडिट नोट देणार आहे. वाकड बाह्यवळण ते सांगवी या कामासाठीही क्रेडीट नोट दिली जाणार आहे.
पुणे महापालिका क्रेडिट नोटवर तर पिंपरी महापालिका रोख मोबदल्याने काम करणार आहे. त्यामुळे दोनही महापालिकांना एकत्रिक काम करणे शक्य नव्हते. मुळा नदीच्या डाव्या बाजूचे विकसन पिंपरी महापालिका करणार आहे. -संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांकडून संयुक्त निविदा काढून कामे करण्याचे नियोजित होते. मात्र महापालिकेने क्रेडिट नोटवर कामे करण्याचे यापूर्वी निश्चित केले आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. – डाॅ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका