पुणे : स्कूलव्हॅनमधून शाळेत जाणाऱ्या लहान मुलींवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे स्कूलबस आणि व्हॅनमधून शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून स्कूलबस आणि व्हॅनची धडक तपासणी मोहीत सुरू आहे. या मोहिमेत नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) स्कूलबस आणि व्हॅनची तपासणी सुरू केली आहे. यासाठी १० पथके नियुक्त करण्यात आली असून, त्यात एकूण २० अधिकारी इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीचे पालन वाहतूकदारांकडून होत आहे का, याची तपासणी या पथकांकडून केली जात आहे. विशेषत: स्कूलबसमध्ये महिला मदतनीसांची नेमणूक केली आहे का, याची तपासणी होत आहे. याचबरोबर शाळांच्या प्राचार्यांना भेटून आरटीओचे अधिकारी विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. याबाबत शाळांना वारंवार योग्य त्या सूचना केल्या जात आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी दिली.

in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?

हेही वाचा >>> खराडी भागातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीनुसार शाळांमध्ये शालेय परिवहन समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या समितीत पोलीस, आरटीओचे अधिकारी, पालक प्रतिनिधींचा समावेश असतो. प्रत्येक शाळेकडून शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीचे पालन किती प्रमाणात होत आहे हे जाणून घेण्यासाठी https://schoolbussafetypune.org हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. यात शाळांनी विद्यार्थी वाहतुकीसंदर्भात सर्व तपशील भरावयाचे आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली.

हेही वाचा >>> ऐन दिवाळीत खाद्यतेलाचा तुटवडा भासणार ? जाणून घ्या, खाद्यतेलांची आयातीची स्थिती

शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीचे पालन सर्व शाळांनी करणे बंधनकारक आहे. याचे पालन शाळांकडून होते की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. यात दोषी आढळणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची शिफारस शिक्षण विभागाकडे केली जाईल. – अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी

आरटीओची कारवाई (एप्रिल ते सप्टेंबर)

कारवाईचा प्रकार – तपासलेली वाहने – दोषी वाहने – दंड (लाख रुपयांत)

स्कूलबस/व्हॅन कारवाई – ४४२ – १४६ – १४.८९

अवैध विद्यार्थी वाहतूक – ५८२ – १९२ – २१.३९

एकूण – १,०२४ – ३३८ – ३६.२८

पालकांनी करावी तक्रार स्कूलबस आणि व्हॅनचालकाकडून निमयांचे पालन होत नसेल तर त्याची तक्रार आरटीओकडे करता येईल. क्षमतेपेक्षा जास्त मुलांची वाहतूक करणाऱ्या आणि जास्त पैसे घेणाऱ्या स्कूलबस आणि व्हॅनविरोधात आरटीओकडे ई-मेल : rto.12-mh@gov.in  येथे पालक तक्रार करू शकतात.