जिल्ह्यातील शारीरिक विकलांग विद्यार्थ्यांच्या विशेष शाळांची शिक्षण विभागाकडून तपासणी होणार आहे. गुणवत्तेसोबतच शाळांमध्ये चांगल्या भौतिक सुविधा पुरवल्या जात आहेत किंवा कसे, याची वर्षातून तीन वेळा तपासणी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकऱ्यांनी दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या शाळांमधील त्रुटी दूर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात येणार असून त्या पूर्ण न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे. जिल्ह्यात शारीरिक विकलांग विद्यार्थ्यांच्या ७७ विशेष शाळा आणि कर्मशाळा आहेत. या शाळांची तपसाणी करण्यासाठी केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी यांच्या मार्फत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राज्यातील शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी कार्यक्षमता प्रतवारी निश्चित केली आहे. त्या अनुषंगाने ही तपासणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा : पुणे : मिळकत कराच्या फरकाची रक्कम भरण्याला तूर्त स्थगिती

या शाळांची वर्षांतून तीन वेळा तपासणी करण्यात येणार आहे. या शैक्षणिक वर्षांतील तपासणी याच महिन्यात केली जाणार असून दुसरी तपासणी डिसेंबर आणि पुढील वर्षाच्या जानेवारीत, तर तिसरी तपासणी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये करण्यात यावी, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. तपासणी अधिकाऱ्याने शाळांच्या प्रत्येक तपासणीनंतर शेरे पुस्तकांत नोंदी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटी सुधारून पुन्हा एकदा शाळांना भेटी देण्याची सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : पुणे : पदवी प्रथम वर्ष प्रवेशांबाबत बीएमसीसीला नोटिस; महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह

किमान बाबींची पूर्तता आवश्यक

केंद्र व राज्य सरकारच्या निकषांनुसार या शाळांमध्ये किमान ९० बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. या तपासणीतून त्यांची सद्य:स्थिती पाहण्यात येईल. त्या नसल्यास त्रुटी दूर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली जाईल. त्यानंतर मात्र, कारवाई केली जाणार आहे, असेही आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspection of special schools in the pune district three times a year pune print news tmb 01