पुणे : कसबा विधानसभा मतदार संघात प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भरारी पथक, नाका तपासणी पथकाकडून आतापर्यंत दहा हजार ६६८ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. निवडणुका शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याकरिता प्रशासनाने नियोजन केले आहे. आचारसंहितेचे पालन करण्याबाबत आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पोटनिवडणुकीत लाखोंची उधळण, कसब्यात भाजपचे हेमंत रासने, तर चिंचवडमध्ये ‘राष्ट्रवादी’चे नाना काटेंकडून सर्वाधिक खर्च

प्रशासनाकडून कसब्यात नऊ तपासणी नाके, तसेच नऊ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांमार्फत संपूर्ण मतदारसंघात वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. तसेच भरारी पथकाकडून संपूर्ण प्रचार यंत्रणेचे चित्रीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत भरारी आणि नाका तपासणीमध्ये दहा लाख ५३ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले आहेत, तर १२ हजार २५० किमतीचे २३१ लिटर मद्य हस्तगत करण्यात आले आहे. आचार संहितेचे पालन करण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे , अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspection of ten thousand vehicles in kasba peth constituency pune print news psg 17 ysh
Show comments