पुणे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) विनाअनुदानित महाविद्यालयांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रार निवारणासाठीची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार संस्थास्तरावर तक्रार निवारण समितीची स्थापना करावी लागणार असून, आता शिक्षक-शिक्षकेतरांच्या तक्रारी पंधरा दिवसांमध्ये संस्थास्तरावरच सुटू शकणार आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्द केले आहे. एआयसीटीईच्या ५३ व्या नियामक मंडळाच्या चर्चा होऊन नियामक मंडळाने तक्रार निवारण समिती, अपिलीय समिती स्थापन करण्यास मान्यता देऊन अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> खोदकामात सोन्याची विट, हिरे सापडल्याची बतावणी ; माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या संचालकाची दहा लाखांची फसवणूक

त्यानुसार तक्रारदाराने त्याची तक्रार संबंधित संस्थेच्या प्राचार्यांकडे तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष म्हणून सादर करावी. संस्थास्तरावरील तक्रारीचे निवारण पंधरा दिवसाच्या आत करण्यात करावे. तसेच तक्रार निवारण समितीने दिलेला आदेश तक्रारदारास मान्य नसल्यास समितीच्या आदेशाची प्रत मिळाल्यापासून पंधरा दिवसात अपिलीय समितीकडे अपील करता येईल. तक्रारदाराचा अपीलाबाबतचा अर्ज दाखल झाल्यावर अपिलिय समितीने कमाल तीस दिवसांत आदेश द्यावेत, असे नमूद करण्यात आले आहे.

संस्थास्थरावरील तक्रार निवारण समितीच्या स्थापनेबाबतचे आदेश तात्काळ देऊन संस्थेच्या संकेतस्थळावर त्यास प्रसिद्धी द्यावी. तसेच अपिलीय समितीच्या स्थापनेबाबतचे आदेश मंडळाच्या संबंधित विभागीय कार्यालयाने तात्काळ प्रसिद्ध करावेत. तक्रारींबाबतची कार्यवाही संस्थास्तरावर, अपील समितीकडे होणे आवश्यक आहे. थेट मंडळाकडे किंवा वरिष्ठ कार्यालयाकडे थेट तक्रार प्राप्त झाल्यास त्याबाबत कार्यवाही करण्यात येणार नसल्याचे एमएसबीटीईचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी स्पष्ट केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Institution level committee for redressal of teacher non teacher staff pune print news zws