पुणे : देशातील आघाडीची वित्ततंत्रज्ञान कंपनी फोनपेने तिच्या मंचावर फक्त ५९ रुपयांपासून सुरू होणारी नवीन डेंग्यू आणि हिवताप विमा योजना सुरू करण्याची घोषणा केली. ही किफायतशीर आरोग्य संरक्षण योजना कीटकजन्य आणि वायूप्रदूषणाशी निगडित आहे.
या योजनेत वैद्यकीय खर्चासाठी १ लाखांपर्यंतचे सर्वसमावेशक वार्षिक विमा संरक्षण ग्राहकाला मिळेल. या विमा संरक्षणामुळे विशेषत: छोट्या व मध्यम शहरांमध्ये वर्षभर अशा आजारांमुळे होणाऱ्या अनपेक्षित वैद्यकीय खर्चापासून ग्राहक आर्थिकदृष्ट्या संरक्षित राहतील. ही योजना फोनपे ग्राहकांना हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, फायलेरियासिस, जपानी विषमज्वर, स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू, घटसर्प, फुफ्फुसीय क्षयरोग आणि मेंदूज्वर यासह १० पेक्षा जास्त आजारांविरुद्ध सर्वसमावेशक विमा संरक्षण देते.
संरक्षण नेमकं काय?
ग्राहकांना विमा संरक्षणामध्ये रुग्णालयीन उपचाराचा खर्च, रोगांचे निदान आणि अतिदक्षता विभागातील उपचार आदी बाबींचा समावेश आहे. इतर हंगामी योजनांप्रमाणे या योजनेचे संरक्षण केवळ पावसाळ्यापुरते मर्यादित नाही. फोनपे ग्राहकांना वर्षभर हे विमा संरक्षण मिळेल. याव्यतिरिक्त, विमाधारक हे शंभर टक्के डिजिटल दाव्यांच्या प्रक्रियेसह फोनपे उपयोजनाद्वारे त्वरित खरेदी, नियोजन आणि दावे दाखल करू शकतात, तसेच जलद दावे निकाली काढण्याची प्रक्रिया अवलंबण्यात येणार आहे.
फोनपेचं म्हणणं काय?
या योजनेबद्दल माहिती देताना, फोनपे इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गुप्ता म्हणाले की, फोनपेद्वारे, आम्ही सर्वांना सुलभ आणि परवडणारी विमा सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. या योजनेतून आमच्या ग्राहकांना वर्षभर सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करण्याच्या आमचा उद्देश आहे. याद्वारे, दर्जेदार सेवेतील आर्थिक अडथळे दूर करून आरोग्यविषयक धोके प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी आमच्या ग्राहकांना सक्षम करण्याचे आमचे ध्येय आहे. डिजिटल वितरणातील आमच्या कौशल्याचा फायदा घेऊन, देशभरातील वंचित लोकांना अनुरूप विमा उपाय प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे.