पुणे पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या गुंडांसह तिघांना अटक केल्यानंतर सोमवारी रात्री उशीरा विश्रांतवाडीतील मिठाच्या गोदमात छापा टाकून ५५ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. पुणे पोलिसांनी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. वैभव उर्फ पिंट्या भारत माने (वय ४०, रा. खडीचे मैदान, सोमवार पेठ), अजय अमरनाथ करोसिया (वय ३५)आणि हैदर शेख (रा. विश्रांतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> धक्कादायक! पुण्यात पार्किंगच्या वादातून महिलेला जाळून टाकण्याचा प्रयत्न

सोमवार पेठेतील खडीचे मैदान परिसरात गुंड पिंट्या माने आणि अजत करोसिया यांना गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून पकडले. त्यांच्याकडून एक कोटी रुपयांचे ५०० ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. पोलिसांनी दोघांची चौकशी केली. तेव्हा विश्रांतवाडीतील हैदर शेखने मेफेड्रोन विक्रीस दिल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके पाठविण्यात आली. हैदरला पोलिसांनी ताब्यात घेतले. हैदरकडून अडीच कोटींचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. हैदरने गोदामात मिठाच्या पोत्यात मेफेड्रोन लपविले होते. पोलिसांनी १०० ते २०० पोत्यांची तपासणी केली. सोमवारी रात्री उशीरापर्यंत तपासणी सुरू होते. पोलिसांनी हैदरने मिठाच्या पोत्यात लपविलेले ५५ किलो मेफेड्रोन जप्त केले असून, जप्त केलेल्या ५५ किलो मेफेड्रोनची किंमत ५५ कोटी रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोदामाच्या परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.