पुणे :मोशीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन केंद्र आहे. या केंद्राच्या सर्व बाजूंच्या सीमाभिंतीलगत कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रदर्शन केंद्राच्या पूर्व बाजूस पुणे-नाशिक महामार्ग असून, सीमाभिंतीलगत मोठ्या प्रमाणात कचरा आणि राडारोडा आणून टाकला जात आहे. जवळच असणाऱ्या उपबाजार समितीतून खराब झालेला भाजीपाला काही विक्रेते टेम्पोमधून येथे आणून टाकत आहेत. या परिसरात अनेक बांधकामे सुरू असून त्याचा राडारोडादेखील याच ठिकाणी आणून टाकला जात आहे. यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना शहराच्या अस्वच्छतेचे दर्शन घडत आहे. अशीच परिस्थिती उत्तर बाजूच्या सीमाभिंतीलगत आहे. या ठिकाणीदेखील वेगवेगळ्या प्रकारचा कचरा आणून टाकला जात आहे. यात भर म्हणून पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात येणारे वाहनचालकही कचरा रस्त्यावर टाकत आहेत. यामुळे येथील नागरिक हैराण आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा