‘यत्र नार्यस्तु पूजन्ते तत्र देवता रमन्ते’ असे संस्कृत वचन आहे. प्राचीन परंपरा असलेल्या आपल्या देशामध्ये स्त्रियांचा सन्मान केला जातो, असे म्हटले जाते. आई, बहीण, पत्नी, कन्या अशा वेगवेगळ्या नात्याच्या माध्यमातून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महिलांचे महत्त्वाचे स्थान आहे. भारताच्या लोकसंख्येमध्ये ५० टक्के वाटा महिलांचा आहे. पण, त्यांना तेवढय़ा प्रमाणात समान हक्क दिले जातात का? घरातील निर्णयप्रक्रियेमध्ये त्यांना कितपत स्थान आहे आणि महिलांना त्यासंदर्भात तरी अधिकार आहेत का असे मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. जीवनाच्या विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करण्यामध्ये महिला आघाडीवर आहेत, असे दृश्य दिसत असले तरी अजूनही महिलांच्या वेगवेगळ्या प्रश्नांबाबत सरकारी पातळीवर आणि सामाजिक स्तरावर देखील तेवढय़ा गांभीर्याने घेतले जाते का? अशा विविध प्रश्नांचे मूलभूत अध्ययन करून प्रबोधनाची नवी दृष्टी देण्याचे काम ‘दृष्टि स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र’ करीत आहे. प्रत्यक्ष चळवळी करणाऱ्या आणि लढा उभारणाऱ्या महिलांना अपेक्षित साधनसामग्री पुरविण्याचे काम ‘दृष्टि’ संस्थेमार्फत केले जात आहे. मात्र, त्याच वेळी महिलाविषयक काम करणाऱ्या भारतीय स्त्री शक्ती जागरण संस्थेच्या महिला प्रश्नांसंदर्भात आयोजित केलेल्या विविध विषयांवरील कार्यक्रमांमध्ये दृष्टि संस्थेचा सक्रिय सहभाग असतो.

दृष्टि स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र महिलाविषयक माहिती, तिचा संग्रह आणि संशोधनाचे काम गेली २० वर्षे करीत आहे. महिलाविषयक माहितीचा संग्रह दर महिन्याला ‘महिला विश्व’ या नावाने प्रकाशित केला जातो. १९९६ पासून विविध वृत्तपत्रात आणि नियतकालिकांत प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि लेखांचे संकलन करून त्याचे प्रकाशन केले जाते. या मासिक अंकामध्ये विशेष कामगिरी, लष्कर, कायदा, राजकीय निर्णय, आरोग्य, शिक्षण, सामाजिक चळवळ, नोकरी, धर्म, सुरक्षा, खेळ अशा विविध विषयांवर महिलांसदर्भातील वृत्तांचे संकलन असते. २००० पासून तर विविध विषयांवरील वृत्तांचे स्कॅनिंग करून ठेवण्यात आले आहे. कागद जुना झाल्यानंतर त्यावरील मजकूर वाचता येत नाही. कित्येकदा तर केवळ कात्रणांच्या हाताळणीमुळे कागद जीर्ण होऊ शकतो. या शक्यता ध्यानात घेऊन बातम्या आणि लेखांचे स्कॅनिंगच्या माध्यमातून जतन करण्याच्या निर्णय घेतला असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. महिलांसंबधी वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास मंडळांमध्ये चर्चा आणि परिसंवादाचे आयोजन केले जाते. या अभ्यास मंडळाच्या माध्यमातून वेळेचे व्यवस्थापन, कार्बनचा परिणाम, ताणतणावाचे व्यवस्थापन अशा विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन केले जाते.

Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maori leader protest in newzealand
विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Archaeologists discover a 4000-year-old coffin inside another coffin of Egyptian priestess
Lady of the House: मृत्यूनंतर ४,००० वर्षांनी लागला तिचा शोध; कोण होती इजिप्तची ‘lady of the house’?

दृष्टि स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राच्या गीता गोखले या अध्यक्षा आहेत. सुनीला सोवनी या कार्याध्यक्षा असून डॉ. अंजली देशपांडे सचिव म्हणून काम पाहत आहेत. तर, प्रमिलाताई मेढे, सुवर्णा रावळ, गीता गुंडे, निर्मला आपटे, शांताक्का, निशिगंधा मोगल, पुष्पा नडे, डॉ. मुक्ता मकाणी, रंजना करंदीकर आणि अरुणा सारस्वत यांचा कार्यकारिणीमध्ये समावेश आहे. संस्थेमध्ये काही कार्यकर्त्यां अल्पशा मानधनावर काम करीत आहेत. तर, काही कार्यकर्त्यां या स्वेच्छेने कार्यरत आहेत. दृष्टितर्फे दरवर्षी महिलांसंबधी एका विशिष्ट विषयावर आधारित विशेषांकाचे प्रकाशन केले जाते. डॉ. अंजली देशपांडे या विशेषांकाच्या संपादक असून त्यांना स्वाती लेले आणि रंजना खरे यांचे संपादनाच्या कामामध्ये साहाय्य लाभते. त्याचप्रमाणे महिलांसंबंधी विषयांवर अभ्यास मंडळामध्ये चर्चा आणि परिसंवादाचे आयोजन करणे हाही दृष्टि संस्थेचा एक हेतू आहे. दृष्टि स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राने महाराष्ट्रातील बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण’, ‘झारखंड, ओडिसा, छत्तीसगड येथील घरकाम करणाऱ्या तरुण महिलांचे स्थलांतर-एक अभ्यास’ आणि ‘लिंगनिहाय आर्थिक अंदाजपत्रक-एक संकल्पना’ ही प्रकाशने प्रकाशित केली आहेत. संस्थेने पुणे शहर आणि जिल्हा पातळीवर महिला आणि मुलींसाठी कार्यरत असलेल्या संस्था आणि संघटनांची ‘महिला संस्था संचयिका’ म्हणजेच डिरेक्टरी हा प्रकल्प सिद्ध केला आहे. राष्ट्रीय सर्वागीण ग्रामविकास संस्थेच्या पूनम मेहता आणि ‘देणे समाजाचे’ या उपक्रमाद्वारे सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यां वीणा गोखले यांच्या हस्ते नुकतेच या संचयिकेचे प्रकाशन करण्यात आले.  या संचयिकेच्या निर्मितीमागची कहाणी ही मोठी रंजक आहे. या संचयिकेच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या नीलाक्षी गोडबोले यांनी या निमित्ताने वेगवेगळे अनुभव घेतले. सव्वा वर्षांच्या अथक परिश्रमातून आणि प्रयत्नांतून ही संचयिका सिद्ध झाली आहे. महिलांच्या प्रश्नांचा अभ्यास करणारी संस्था असल्यामुळे महिलांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अनेक लोक दृष्टिमध्ये चौकशीला येत असतात. अनेकांकडे सामाजिक कामासाठी वेळ आहे तर काही लोकांकडे या कामाला देण्यासाठी पैसे आहेत. सगळ्याच ठिकाणी दृष्टि पोहोचू शकत नाही, या आमच्या संस्था म्हणून काही अंशी मर्यादा आहे. ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांना या वेळेचा सदुपयोग करावयाचा आहे. तर, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना तो नेमका कोणाला द्यावा, कोणत्या संस्थेला आर्थिक मदतीची गरज आहे हे ध्यानात येत नाही. काही संस्था अशा आहेत, की ज्यांना आर्थिक मदत आणि सामाजिक काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांचे पाठबळ हवे आहे. या सर्व गोष्टींची पूर्तता कशी करावयाची या विचारातूनच पुणे शहर आणि जिल्हा पातळीवर महिला आणि मुलींसाठी काम करणाऱ्या संस्थांची एक संययिका करावी, ही संकल्पना पुढे आली.  या संचयिकेच्या माध्यमातून दृष्टिला आणि अन्य संस्थांनाही अशा प्रकारचे काम करणाऱ्या संस्थांची एकत्रित माहिती मिळाली तर, उपयुक्त होईल असा विचार दृष्टिच्या कार्यकर्त्यां भगिनींनी केला. विविध संस्थांची अशी माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. या संचयिकेत माहिती घेताना ती संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदविलेली असली पाहिजे हा प्राथमिक निकष होता. त्या संस्थेच्या माहितीसाठी तयार करण्यात आलेली छोटी प्रश्नावली संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्याने भरून द्यावयाची आणि दृष्टिच्या कार्यकर्त्यांनी त्या संस्थेला प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे, हे दोन निकष नक्की केले होते. इंटरनेट आणि सर्वसाधारण माहितीच्या आधारे शहर आणि जिल्ह्य़ातील ११० संस्थांची यादी डोळ्यासमोर होती. काही संस्थांचे पत्ते चुकीचे होते. तर, काहींचे दूरध्वनी क्रमांक चुकीचे होते. ज्या प्रकल्पावर संस्था काम करीत होती त्या प्रकल्पाची पूर्ती झाल्यामुळे ती संस्था आता कार्यरत नाही, अशीही दोन-तीन उदाहरणे सापडली. दृष्टिकडे आलेल्या संस्थांच्या सूचीपैकी ७७ संस्थांना कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. संस्थांचे विविध प्रकार या निमित्ताने पाहावयास मिळाले. काही केवळ कागदावरच्या संस्थाही समजल्या. काही संस्थांचे प्रत्यक्ष कार्य ग्रामीण भागात असले, तरी त्यांचे कार्यालय मात्र शहरामध्ये होते. काही नावाजलेल्या संस्थांनी अनेकदा पाठपुरावा करूनही प्रश्नावली स्वरूपात माहिती भरून दिली नाही. त्यामुळे अशा संस्थांचा या संचयिकेमध्ये त्यांचा समावेश करता आला नाही. सृष्टि संस्थेच्या रंजना खरे, नीलाक्षी गोडबोले, स्वाती लेले, सारिका वाघ, शुभांगी साळी, साधना आलेगावकर, प्राजक्ता खरे, संगीता भागवत, विद्या पुराणिक आणि मेधा दांडेकर या कार्यकर्त्यांनी विविध संस्थांना भेट दिली. ७७ संस्थांपैकी १३ संस्थांनी प्रश्नावली भरून दिली नाही. त्यामुळे या संचयिकेमध्ये ६४ संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे शहरातील ४१ तर जिल्ह्य़ातील २३ संस्था समाविष्ट आहेत. भविष्यामध्ये अशा संस्थांची प्रश्नावली भरून आली तर संचयिकेच्या पुढील आवृत्तीमध्ये त्या संस्थांचा समावेश करणे शक्य होऊ शकेल.  हा संचयिका प्रकल्पातील सुरुवातीचा प्रकल्प आहे. सध्या तरी पुणे शहर आणि जिल्हा एवढीच या प्रकल्पाची व्याप्ती आहे. अन्य जिल्ह्य़ांसाठीही हा प्रकल्प राबविता येणे शक्य होईल.

कालांतराने ते देखील करावे लागेल. अशा प्रकल्पाच्या निमित्ताने महिला आणि मुली यांच्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे काम करणाऱ्या विविध प्रकारच्या सामाजिक संस्थांचे जाळे आणि त्यांची जोडणी करता येणार असून सर्वानाच त्याचा फायदा होऊ शकेल.