International Women’s Day 2019 : आज जागतीक महिला दिन आजच्या स्त्रिया या स्वावलंबी असून स्वतः सक्षम आहेत.मात्र,आपल्याच जवळच्या व्यक्तींमुळे काही स्त्रिया दुःख सहन करत आहेत.सुवर्णा भानुमते या गेल्या चार वर्षांपासून व्हील चेअरवर आहेत.त्याचा प्रेम विवाह झाला होता.मात्र लग्नाच्या काही वर्ष्यानी त्यांना पायाचा गंभीर आजार झाला आणि सात जन्माची साथ देईल अस वचन देणारा कायमचा निघून गेला.त्यांना आता त्यांची आई सांभाळते एक महिला आणि मुलगी म्हणून त्याच सुवर्णा यांचं दुःख समजून घेऊ शकतात.परंतु,सुवर्णा यांचा प्रेमावरचा विश्वास उडाला असून प्रेम विवाह केल्याचा पश्चताप झाल्याचा लोकसत्ता ऑनलाइन शी बोलताना सांगितले.
२००४ साली सुवर्णा यांचा प्रेम विवाह झाला.सुवर्णा यांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली होती.व्यवसायाने ठेकेदार असलेल्या पती सोबत त्यांचा सुखाने संसार सुरू होता.काही वर्ष्यानी त्यांना गोंडस मुलगा झाला.आज तो इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत आहे.परंतु,त्यांच्या सुखी संसाराला नजर लागेल हे त्यांना स्वप्नात ही वाटलं नसेल आणि २०१५ ला पायाचा गंभीर आजार झाला.त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं,उपचार सुरू झाले.मात्र आजार बरा होत नव्हता. काही दिवस पती रुग्णालयात आले मात्र त्यानंतर ते दिसलेच नाहीत अस सुवर्णा यांनी सांगितले.ज्याने सात जन्म साथ देईल अस वचन दिले होत तो माझ्यापासून कायमचा दूर गेला अस म्हणत सुवर्णा यांचे डोळे पाणावले.
सध्या सुवर्णा या व्हील चेअरवर असतात त्यांना स्वतः ची कुठलीच काम करत येत नाहीत.महिलाच महिलेचे दुःख समजू शकते हे खरं आहे,कारण पोटच्या मुलीला असा आजार झाल्याचं पाहून त्यांची आई खचली नाही.त्या तिला सांभाळत असून आता मात्र त्या देखील थकल्या आहेत.प्रेम विवाह करून पश्चाताप होत आहे आईकडून पैसे घेऊन पतीला पिंपरी-चिंचवड शहरात घर घेऊन दिलं मात्र पुढे अस काही होईल हे क्वचित वाटलं नव्हतं.सध्या समाजसेविका अदिती निकम आजार बरा व्हावा यासाठी प्रयत्न करत असून त्यांना मदत करत आहेत. त्यांच्या विविध डॉक्टरांकडे भेटी गाठी सुरू आहेत.सुवर्णा या खचल्या नाहीत मात्र,जवळच्या व्यक्तीनेच त्यांना आयुष्याच्या वाटेवर अर्ध्यात सोडल्याने त्या एकट्या पडल्या आहेत.