दहशतवादी घटना, गुन्ह्य़ांची उकल आणि अवघड गुन्हेगारांचा माग अशा बिकट परिस्थितीत सुरक्षा दल आणि पोलिसांच्या कार्यवाहीतील सक्षम भूमिका बजावते ते श्वानपथक! स्कॉटलंड यार्डपासून जगातील सर्वच पोलीस यंत्रणांचे संचित हे त्यांचे श्वानपथक आहे. भयाच्या ‘मानवी’ मर्यादा ओलांडून ही श्वानपथके गुन्हा आणि धोका थोपविण्याची कामगिरी बजावतात तरीही सामान्य जगासाठी बहुतेक वेळा अज्ञात राहतात. जंझीर, मॅक्स, सुलतान, टायगर, सिझर, रेक्स, रुदाली, मानसी या श्वानवीरांनी जिवाची बाजी लावत दुर्घटना टाळल्या आहेत. मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कोलाहलात पोलीस यंत्रणेला सर्व क्षमतेनी मदत करणाऱ्या ‘सिझर’ या लढवय्या श्वानाचा नुकताच मृत्यू झाला. त्या निमित्ताने कर्मयोग्यासारखी सेवा बजावणाऱ्या श्वानपथकांच्या यंत्रणेची ओळख करून घेणे महत्त्वाचे ठरेल.

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो मृत्युमुखी पडले. तेवढेच जखमी झाले. पण या काळात श्वानपथकाने शहरात विविध ठिकाणी दडविण्यात आलेल्या स्फोटकांचा छडा लावत भीषण दुर्घटनांना टाळले. मॅक्स, सुलतान, टायगर आणि सिझर या चार श्वानांची यात अग्रभूमिका होती. यातील मॅक्सला त्यासाठी सुवर्ण पदकही देण्यात आले होते. ताज हॉटेलच्या बाहेरील स्फोटके त्याने शोधून काढली होती. सिझरने सर्वात गर्दीच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून स्फोटके शोधून काढली होती. २६/११ च्या हल्ल्यात कामगिरी बजावलेल्या पथकातील शेवटच्या श्वानाचा मृत्यू पोलीस यंत्रणेपासून सर्वासाठी हळहळ निर्माण करणारी घटना होती.

Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
eknath shinde comment ladki bahin yojana daryapur vidhan sabha
मुख्‍यमंत्री म्हणतात, मी शंभरवेळा तुरूंगात जाण्‍यास तयार…कारण…
maharashtra assembly election 2024 religious polarization experiment in solapur city central assembly elections
लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात

या श्वानपथकामुळे काय घडू शकते, दुर्घटनांना पायबंद कसा लागतो हे आपल्यापर्यंत कोरडय़ा बातम्यांनी पोहोचते. परंतु त्या वृत्तांकनापलिकडे या श्वानांची कार्यपद्धती धाडसी आणि अद्भुत आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर मुंबईच्या श्वानपथकातील ‘जंझीर’च्या कामगिरीकडे पाहता येईल. १९९३ च्या बॉम्बस्फोटात जवळपास हजारो किलो स्फोटके, पन्नासहून अधिक रायफल आणि पिस्तुलांनी भरलेल्या बॅग, शंभरहून अधिक हातबॉम्बचा साठा त्याने शोधून काढला होता. केंद्रीय सुरक्षा दलांमधील रेक्स, रॉक, रॉकेट, रुदाली, अ‍ॅलेक्स, मानसी, कुमार.. यांनीही सीमारक्षणासाठी, हरवलेल्या सैनिकांना शोधण्यासाठी, युद्धाच्या काळात बजावलेली भूमिका जवानांइतकीच महत्त्वाची ठरली आहे. गेल्याच वर्षी सीमेवर गस्त घालणाऱ्या श्वानपथकापैकी ‘मानसी’ ला कसलीतरी चाहूल लागली. तिने आपल्या पालक असलेल्या बशीर अहमद जवानाला याबाबत इशारा दिला. तत्काळ अतिरेक्यांचा शोध घेणे सुरू झाले. अतिरेकी सापडले. मात्र त्या वेळी झालेल्या गोळीबारात मानसी आणि अहमद यांना वीरमरण आले. एप्रिलमध्ये झालेल्या पठाणकोट हल्ल्यात ‘रॉकेट’ या श्वानाने आगीचा सामना करून अतिरेक्यांचे सामान, शस्त्रास्त्रे शोधून काढली होती. या हल्ल्यातील महत्त्वाचे पुरावे म्हणून त्याचा उपयोग झाला. एनएसजीमध्ये काम करणाऱ्या मॅलनीज जातीच्या ‘रॉकेट’ला आणि त्याच्या पालकाला शौर्यपदक देण्याची शिफारस सैन्य दलाकडून करण्यात आली आहे.

सुरक्षा दलांची श्वानपथके

मध्ययुगापासून मानवाकडून कुत्र्यांचा वापर सुरक्षेसाठी, हव्या त्या गोष्टीचा माग काढण्यासाठी केला जात आहे. फ्रान्स, स्कॉटलंड देशांत १४ व्या शतकापासून श्वानपथकांच्या नोंदी आहेत. अमेरिकेच्या श्वानपथकाने इराक-अफगाणिस्तानातील युद्धात केलेल्या कामगिरीवर कथा-कादंबऱ्या रचण्यात आल्या आहेत. भारतात १९५९ पासून सुरक्षा दलात श्वानपथक बाळगले जात आहे. पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, रेल्वे पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी), राष्ट्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) या सुरक्षा दलांची श्वानपथके आहेत. याशिवाय तस्करी रोखण्यासाठी वन विभागाचेही श्वानपथक आता तयार करण्यात आले आहे. सैन्य दलात उत्तम वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या कुत्र्यांना पदकेही दिली जातात. मुंबई पोलिसांचे श्वानपथकही प्रसिद्ध आहे. यातील पहिल्या तुकडीतील कुमार, राजापासून या पथकात सध्या असलेल्या श्वानांनी सुरक्षा व्यवस्थेला मदत केली आहे. महत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे, सण, उत्सव, मोठे समारंभ अशा ठिकाणी श्वानपथके आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांचे कार्य शौर्याच्या आपल्या व्याख्येमुळे दुर्लक्षित असले, तरी महत्त्वाचे आहे, हे विसरून चालणार नाही.

श्वानपथकांचे प्रकार

हल्ला करणारे पथक – युद्धात शत्रू ओळखून त्यावर हल्ला करण्यासाठी या पथकांना प्रशिक्षण दिले जाते.

शोधपथक – युद्धात हरवलेले सैनिक किंवा शत्रूचा शोध घेण्याचे काम या पथकांचे असते.

स्निफिंग डॉग – बॉम्ब शोधक पथके, सार्वजनिक ठिकाणी असलेली सुरक्षा यांसाठी ही पथके काम करतात

माग काढणारी पथके – प्राधान्याने पोलीस दलात ही पथके असतात. वासावरून माग काढणे हे त्यांचे काम असते.

पथकांमधील श्वानप्रजाती

राज्याच्या पोलीस दलांमध्ये आणि रेल्वे पोलीस साधारणपणे ‘लॅब्रेडोर’, ‘गोल्डन रिट्रिव्हर’, ‘जर्मन शेफर्ड’, ‘डॉबरमन’ या प्रजातीचे कुत्रे वापरले जातात. रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना प्रशिक्षित करण्याचा प्रयोगही दिल्ली पोलिसांनी नुकताच केला आहे. एनएसजीमध्ये ‘मॅलनिज’ म्हणजेच ‘बेल्जियम शेफर्ड’ ही प्रजाती प्रामुख्याने आहे. बीएसएफ आणि सीआरपीएफमध्ये ‘राजपलयम’ या अस्सल भारतीय प्रजातीची कुत्री अधिक प्रमाणात वापरली जातात.

रसिका मुळय़े rasika.mulye@expressindia.com