पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत नागरिकांची ७५ लाख रुपयांची फसवणूक केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पाषाण भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी १५ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर तीन महिन्यांपूर्वी शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारा संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले होते. चोरट्यांनी त्यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पुरी तपास करत आहेत.
वारजे भागातील एकाची शेअर बाजरात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी १७ लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडाख तपास करत आहेत. पाषाण भागातील एका ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती चोरून खात्यातून ऑनलाइन पद्धतीने दहा लाख रुपये चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत ज्येष्ठ महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चंदननगर भागातील एका तरुणाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी १९ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केली. तरुणाने याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने तपास करत आहेत.
हेही वाचा >>>‘निष्ठा काय असते’ शरद पवार यांचं ट्विट चर्चेत, अजित पवार गटाचे हडपसरचे आमदार चेतन तुपे यांना सुनावले
कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक
कारवाईची भीती दाखवून फसवणूक करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. माॅडेल काॅलनी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी १३ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाच्या मोटारीत अमली पदार्थ सापडल्याची बतावणी चोरट्यांनी केली. मुंबई पोलीस दलातून बोलत असल्याचे सांगून चोरट्यांनी अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, अशी बतावणी केली. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांचे मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक ननावरे तपास करत आहेत.