पुणे : आक्र्टिक्टवरील ओझोनच्या नियंत्रणामध्ये आयोडिनच्या रासायनिक क्रियेची भूमिका महत्त्वाची आहे. या रासायनिक क्रियेमुळे आक्र्टिक्ट ओझोनची हानी होत असल्याचे शास्त्रज्ञांच्या संशोधनातून समोर आले आहे. तसेच आक्र्टिक्ट समुद्रातील बर्फाचे प्रमाण घटत असल्याने येत्या काळात आयोडिन उत्सर्जन वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

भारतासह अमेरिका, स्वित्र्झलड, अर्जेटिना, स्वीडन, स्पेन, फिनलंड, डेन्मार्क, सायप्रस, जर्मनी, ऑस्ट्रिया आदी वीस देशांतील शास्त्रज्ञांनी केलेल्या संयुक्त संशोधनाचा शोधनिबंध ‘नेचर जिओसायन्स’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला. या संशोधनात भारतातून पुण्याच्या  उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील  डॉ. अनुप महाजन यांचा सहभाग होता. अंटाक्र्टिकामधील स्ट्रॅटोस्फेरिक ओझोन कमी झाल्याबाबत  चांगल्या रीतीने अभ्यास झाला आहे. क्लोरोफ्युरोकार्बनचे होणारे उत्सर्जन हे त्यामागील मुख्य कारण आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ ओझोनमध्ये घट होताना ओझोन केंद्रीकरण  शून्यावर येते. बर्फाळ   प्रदेशातून उत्सर्जित होणाऱ्या ब्रोमाईनमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील ओझोन कमी होत असल्याचे   मानले जात होते. ब्रोमाईनसारख्याच असलेल्या आयोडिन या घटकाचा काय परिणाम होतो हे अभ्यासण्यात आले नव्हते. त्यामुळे मल्टिडिसिप्लिनरी ड्रििफ्टग ऑब्झर्वेटरी फॉर स्टडी ऑफ आक्र्टिक्ट क्लायमेट  या मोहिमेअंतर्गत  उपकरणे बसवण्यात आलेले जहाज आर्टिक्ट समुद्रातील बर्फात ऑक्टोबर ते मार्च २०२० या कालावधीत ठेवून नोंदी घेण्यात आल्या. 

आक्र्टिक्ट समुद्रात मोठय़ा प्रमाणात बदल होत आहेत. हे बदल झपाटय़ाने होत आहेत. त्यामुळे निसर्गचक्रावर परिणाम होत असल्याने या बदलांवर आता अधिक बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. आयोडिनची आक्र्टिक्ट समुद्रातील बर्फाबरोबर होणारी रासायनिक क्रिया आणि त्याचा परिणाम होऊन ओझोनमध्ये होणारी घट हे त्याचे एक उदाहरण आहे. 

– डॉ. अनुप महाजन, शास्त्रज्ञ, आयआयटीएम

Story img Loader