लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: हिंजवडीतील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला. ध्वनिवर्धकाच्या (डीजे) आवाजामुळे मृत्यू झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. परंतु, तरुणाला मागील सहा महिन्यांपासून हृदयाचा त्रास होता. चक्कर येवून खाली पडल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
actress Sapna Singh teen son found dead in UP (1)
मित्रांबरोबर गेला, दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
fox death Mumbai, Third fox death, fox ,
मुंबई : रेबीजमुळे आणखी एका कोल्ह्याचा मृत्यू, तीन महिन्यांतील कोल्ह्याच्या मृत्यूची तिसरी घटना
Comedian Kabir Kabeezy Singh passed away
‘अमेरिकाज गॉट टॅलेंट’ फेम कॉमेडियन कबीर सिंगचे निधन, ३९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

योगेश अभिमन्यू साखरे (वय २३, रा.मारुती मंदिरासमोर, हिंजवडी गावठाण) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी हिंजवडीतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन झाले. योगेश हा हनुमान तालीम मित्र मंडळाचा कार्यकर्ता होता. मिरवणुकीमध्ये नृत्य करताना डीजेच्या आवाजाने त्याला चक्कर आली. गोळी आणण्यासाठी मेडिकलमध्ये गेला असता खाली कोसळून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. परंतु, योगेश हा मिरवणुकीत नृत्य करत नव्हता. डीजेच्या आवाजामुळे त्याचा मृत्यु झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

आणखी वाचा-जेजुरीतल्या कडेपठारावर अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणारा नराधम अटेकत, पोलिसांची कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश साखरे याला मागील सहा महिन्यापूर्वी बीपीचा त्रास होत होता. तो हिंजवडी येथील स्थानिक डॉक्टरांकडे निदानासाठी गेला असता तेथील डॉक्टरने हृदयाचा त्रास असल्याचे सांगितले. कोकणी चौक येथील डॉक्टरला दाखवून उपचार घेण्याचा सल्ला दिला. बुधवारी रात्री योगेश हिंजवडी चौकात असताना त्याच्या छातीत दुखू लागले. तो मेडिकलमध्ये गोळ्या घेण्यासाठी आला होता. योगेश हा कुठल्याही डीजे समोर नाचत नव्हता असे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. तसेच तो ज्या मेडिकल समोर उभा होता त्या ठिकाणी जवळपास कुठलाही डीजे वाजत नव्हता. मेडिकल जवळ असताना त्याने तेथे आलेले त्याच्या मित्रांना सांगितले की त्याला चक्कर येत आहे आणि तो लगेच चक्कर येऊन जमिनीवर पडला. मित्राने तेथेच जवळ असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी दुसऱ्या रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. रुग्णालयात गेले असता डॉक्टरांनी योगेश याचे निधन झाल्याचे सांगितले.

Story img Loader