हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाला १७ दिवस उलटले आहेत. तरीही, दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर हल्ले सुरूच आहेत. अशातच पुण्यात इस्रायलच्या राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृतीचे स्टिकर्स लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या दृष्टीनं हे स्टिकर्स लावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी पुणे शहरातील तीन पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

नाना पेठेतील होप रूग्णालयाजवळील रस्त्यावर इस्रायलच्या राष्ट्रध्वजाचे स्टिकर्स चिटकवण्यात आले होते. ही माहिती मिळताच समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बांगदार यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?

हेही वाचा : रस्ते अडवले, कारमधील नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार; हमासनं केलेल्या हल्ल्याचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

सईद पठाण आणि शाहनवाज शेख या दोघांनी हापिक शेख उर्फ नोन्या याच्याकडून इस्रायलच्या राष्ट्रध्वजाचे स्टिकर्स घेतले होते. त्यानंतर ते रस्त्यावर चिटकवले. याप्रकरणी पठाण, शाहनवाज आणि नोन्या याच्यावर कलम १५३ ( दंगल घडवण्यास चिथावणी देणं ) आणि कलम ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवारी ( २० ऑक्टोबर ) भवानी पेठेतील चुडामन तालमीजवळील रस्त्यावर इस्रायलच्या राष्ट्रवध्वजाचे स्टिकर चिटकवण्यात आलं होतं. याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : हमासच्या दहशतवाद्यांनी मृतदेहाखाली अन् शाळेच्या बॅगमध्ये लपवली स्फोटके; VIDEO व्हायरल

तसेच, पुण्यातील कॅम्प परिसरातही इस्रायलच्या राष्ट्रध्वजाचे स्टिकर्स रस्त्यावर लावण्यात आले होते. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ‘इंडियन एक्स्प्रेस’नं वृत्त दिलं आहे.

Story img Loader