पिंपरी: जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा १० जून रोजी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. याच निमित्ताने लाखो भाविक, वारकरी देहूत दाखल होत असतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील पिंपरी- चिंचवड शहरामधून आयटी दिंडी पुणे ते सासवड अशी असते, यंदा मात्र ही दिंडी पंढरपूर पर्यंत जाणार आहे. एक हजाराच्यावर या आयटी दिंडीमध्ये उच्चशिक्षित तरुण- तरुणी सहभागी होत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा १० जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी देहूत दाखल होत असतात. वारकरी अगदी देहभान विसरून तुकोबांच्या नाम गजरात पालखी सोहळ्यात सहभागी होऊन आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे पायी जातो. या वारीपासून उच्चशिक्षित असलेले तरुण- तरुणी देखील दूर राहू शकले नाहीत.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरभरती : ३८८ जागांसाठी आले ८५ हजार अर्ज…राज्यातील ९८ केंद्रांवर होणार परीक्षा

पिंपरी- चिंचवड शहरामधून आयटी दिंडीच्या माध्यमातून हेच उच्चशिक्षित तरुण-तरुणी आषाढी वारी निमित्त होणाऱ्या पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत. एक हजारांपेक्षा जास्त संख्या असलेले तरुण-तरुणी यात सहभागी होणार आहेत. खरं तर आयटी अभियंते म्हटलं अत्यंत व्यस्त म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु, वेळात वेळ काढून वारीचा सहवास आणि अनुभव मिळावा म्हणून तू गेल्या काही वर्षांपासून वारीत नियमितपणे सहभागी होतात. अगोदर बोटावर मोजणे संख्या असलेली ही वारी आता हजारोच्या घरात पोहोचलेली आहे. आयटी दिंडीचे सदस्य एकनाथ खनकर यांनी उच्चशिक्षित तरुण- तरुणींना या दिंडीत सहभागी होण्यासाठी आवाहन केलं आहे.