पुणे/बारामती : ‘विकासकामांच्या जोरावर लाखांच्या मताधिक्याने निवडून येणाऱ्या माणसांबाबत असे होत असेल, तर निवडणुकीला उभे न राहिलेलेच बरे,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणूक न लढविण्याचे संकेत देतानाच लोकसभा निवडणुकीतील सुनेत्रा पवार यांच्या पराभवाबाबत खंतही व्यक्त केली. अजित पवार यांनी हे विधान केल्यानंतर बारामतीमधील उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याला जोरदार विरोध दर्शविला. ‘बारामतीमध्ये तुम्हीच आमदार हवे,’ असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला.

‘बारामतीमधून निवडणूक लढविण्यात रस नाही,’ असे वक्तव्य करून अजित पवार यांनी मध्यंतरी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्या पार्श्वभूमीवर, बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात रविवारी झालेल्या कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, ‘मी आता ६५ वर्षांचा झालो आहे. मी तसा समाधानी आहे. जिथे पिकते तिथे विकत नाही, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. मी सोडून बारामतीला दुसरा कोणी तरी आमदार मिळायला हवा. काम करूनही अशी गंमत होणार असेल, तर झाकली मूठ सव्वा लाखांची असेच म्हणावे लागेल. मी सोडून दुसरा कोणी आमदार झाला म्हणजे बारामतीकरांना समजेल.’

Vanraj Andekar murder , Man supplied arms arrested,
पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणात शस्त्रे पुरविणारा सराइत गजाआड
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Indrayani, Eknath Shinde , pollution,
इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी या नद्या प्रदूषणमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Defence Minister Rajnath Singh
Defence Minister Rajnath Singh: “तुम्ही आमचे आहात, पाकिस्तान तुम्हाला…”, पीओकेमधील नागरिकांना राजनाथ सिंहाचे भारतात येण्याचे आवाहन
Pune man jumps into river after quarrel with wife
Pavana River: पत्नीशी भांडून पतीनं नदीत मारली उडी; बचावकार्यात अग्निशमन दलाला आले अपयश, पण ८ तासानंतर…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

हेही वाचा – इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी या नद्या प्रदूषणमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

‘सन १९९१ पासून २०२४ पर्यंत बारामतीकरांनी मला संधी दिली. माझ्या कामाची तुलना अन्य कोणत्याही आमदारांबरोबर करता येणार नाही. बारामतीकरांच्या नादाला लागायचे काम नाही. बारामतीकरांनी मला शिकवायला जाऊ नये. मला उडवून लावले, तर तुमचे काय याचा विचार करा. मला अनेक कामे करायची आहेत. मीपण माणूस आहे. मी जिथे दुसऱ्याला खासदार, आमदार करतो तिथे जर अशी परिस्थिती होणार असेल, तर झाकली मूठ सव्वा लाखाची राहिलेली बरी असे वाटते,’ असे अजितदादा म्हणाले.

‘मी पाच वेळा राज्याचा उपमुख्यमंत्री झालो. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी विविध मंत्रिपदे सांभाळली. मात्र, त्यांनी कधीही अर्थ खाते स्वतःकडे ठेवले नाही. मी माझ्याकडे अर्थ खाते घेतले. त्या माध्यमातून मी मतदारसंघात निधी कसा आणता येईल याचा बारकाईने विचार केला. काही दिवसांपूर्वी माझ्या अर्थ खात्याबद्दल कोणी तरी टिप्पणी केली. त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका,’ अशा शब्दांत त्यांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली.

हेही वाचा – ऐन गणेशोत्सवात सीएनजी महागला! पुणे, पिंपरीतील बदललेले दर जाणून घ्या …

पवार म्हणाले, ‘बारामती मतदारसंघात मला अजूनही भरपूर कामे करायची आहेत. मी कामे करायची की नाही, हे तुमच्या हातात आहे. मीही एक माणूस आहे. इतके सगळे करूनही मला हे बघावं लागत असेल, तर मी निवडणुकीला उभा न राहिलेलाच बरा!’