लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: उन्हाच्या वाढत्या झळा आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील घटता पाणीसाठा या पार्श्वभूमीवर शहरात पाणीकपात अटळ आहे. मात्र दिवसाआड पाणीपुरवठा करण्याऐवजी आठवड्यातून एकदा पाणीबंद ठेवण्याची हालचाल महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरू झाली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीतच या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ubt mla vaibhav naik face nilesh rane kudal in assembly constituency
लक्षवेधी लढत : कुडाळमध्ये राणेंच्या वर्चस्वाचा कस
devendra fadnavis in kalyan east assembly constituency election
कल्याण : विषय संपल्याने रडारड करणाऱ्यांपेक्षा लढणाऱ्यांच्या पाठीशी रहा; देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त
Vidhan Sabha Elections, Elections Pune City,
विचार करण्याची हीच ती वेळ…
assembly seats in cities near mumbai important for mahayuti
मुंबईलगतची महानगरे विधानसभेतही  शिंदे-फडणवीसांना साथ देणार का? येथील जागा महायुतीसाठी महत्त्वाच्या का?

सध्या खडकवासला धरण साखळीत सुमारे १२.३० अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा आहे. या पाण्यातून शहराची तहान भागविली जाणार असून शेतीसाठी उन्हाळी आवर्तनही देण्यासाठी पाच अब्ज घनफूट एवढे पाणी लागणार आहे. यंदा एल निनो मुळे पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला असून वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणीही वाढली आहे. उन्हाळ्याचा अद्यापही दीड महिन्यांचा कालावधी बाकी आहे. उन्हामुळे धरणातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन लक्षात घेता पाणीकपात अटळ असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा… पिंपरी महापालिकेची बेकायदा जाहिरात फलकांवरील कारवाई संथगतीने

या पार्श्वभूमीवर महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये तीन दिवसांपूर्वी बैठक झाली होती. खडकवासला धरणातील पाण्याचा आढावा घेताना पाणी काटकसरीने वापरण्याची सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केली होती. या बैठकीत पाणीकपातीचा निर्णय झाला नव्हता. धरणात अपेक्षित पाणीसाठा नसल्याने समाधानकारक पावसाळा सुरू होईपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, अशी चर्चा आहे. मात्र दिवसाआड पाणीबंद ठेवण्याऐवजी आठवड्यातून एकदा पाणीबंद करण्याचे महापालिकेच्या विचाराधीन आहे.

हेही वाचा… पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आठ टन गोमांस पकडले; टेम्पोत कांदा आणि बटाट्याच्या आड गोमांस

शहराच्या अनेक भागाला सध्या विस्कळीत आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. दिवसाआड पाणीपुरवठा केल्यास त्याचा परिणाम पुढील दोन दिवस रहातो. पाणीबंद असल्यानंतर पुढील काही दिवस अपुरा पाणीपुरवठा होता. त्यामुळे आठवड्यातून एकदा पाणीबंद ठेवणे उपयुक्त राहील, असा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे. मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येत्या काही दिवसांत होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत होणार आहे.

हेही वाचा… पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केल्यास नळजोड तोडणार; पिंपरी- चिंचवड महापालिकेचा इशारा

पाण्याची गळती शोधण्यासाठी महापालिकेने प्रायोगिक तत्वावर ‘ॲकेस्टीक सेन्सर’ या अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने वडगाव जलकेंद्रापासून कात्रज येथील केदारेश्वर पाण्याच्या टाकीपर्यंतच्या मुख्य वाहिनीवर १३ ठिकाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार गळती बंद करण्याचे काम हाती घेतले आहे. याच पद्धतीने मुख्य जलवाहिन्यांमधून हाेणारी पाण्याची गळती शाेधून ती बंद केली जाणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर गाड्या धुण्यासाठी करणाऱ्या वाॅशिंग सेंटरवरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बांधकामासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्याची सूचना बांधकाम व्यावसायिक आणि महापालिकेच्या अन्य विभागांना देण्यात आले आहेत.