दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारा नरेंद्र मोदी यांचाच माणून होता, अशा शब्दांत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. पुण्यात आयोजित एल्गार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.
कोळसे पाटील म्हणाले, मोदींनी देशासाठी खूप काही केलं असं म्हटलं जातं. पण त्यांनी काहीही केलं नसून पठाणकोटमध्ये मुंगी देखील जाऊ शकत नसताना दहशतवादी पोहोचलेच कसे? तसेच दिल्ली येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झेंडा फडकवणारा मोदींचा माणूस होता, अशा त्यांनी शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
अनेक मोदी येतील आणि जातील पण अखेरच्या श्वासापर्यंत मनुवादाविरोधात आमची लढाई सुरू राहील, असा निर्धार यावेळी कोळसे पाटील यांनी व्यक्त केला. तसेच मनुवादी आणि मनीवादी (भांडवलदार) एकत्र येऊन जात, पंथ, धर्माच्या नावाने आपले शोषण करत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.