संगीत नाटक अकादमीने गौरववृत्ती जाहीर करून साहित्याच्या प्रांतामध्ये केलेल्या कामाची दखल घेतली असल्याचा आनंद झाला, अशी भावना ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केली. या गौरववृत्तीने मराठी माणसांना आनंद झाला असेल तर, त्याचा मलाही आनंद आहे, असेही ते म्हणाले.
संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारांवर मराठी मुद्रा जाणवते, याकडे लक्ष वेधले असता एलकुंचवार म्हणाले,‘‘कलेच्या क्षेत्रामध्ये मी प्रांत, जात असा भेद करत नाही. महाराष्ट्र म्हटल्यावर मग, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र की कोकण असा संकुचितपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच ही गौरववृत्ती जाहीर झाल्यावर ती लेखकाला मिळाली याचा आनंद आहे. मी मराठी असल्यामुळे मराठी माणसांना आनंद झाला असेल,  तर मलाही त्याचा आनंद आहे. पण, माझ्या मराठीपणाचा गवगवा करावा, असे काही मला वाटत नाही.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा