पुणे : देशाच्या अवकाश मोहिमांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आदित्य एल-१ या सौरमोहिमेसाठी ‘सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप’ (सूट) या उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका) आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) यांनी या उपकरणाची निर्मिती केली असून, सूर्याविषयीच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्याबरोबरच अतिनील तरंगलांबीतील अद्ययावत निरीक्षण ‘सूट’मुळे मिळू शकणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सूर्याच्या अतिनील किरणांचा अभ्यास करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होणार आहे.

आयुकाचे प्रा. ए. एन. रामप्रकाश आणि प्रा. दुर्गेश त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नुकतेच सूट हे उपकरण आयुकाकडून इस्रोला हस्तांतरित करण्यात आले. आयुकामध्ये प्रथमच पूर्ण अवकाशीय उपकरण विकसित करण्यात आले. त्यासाठीच्या आवश्यक पायाभूत सुविधा आयुकामध्ये विकसित करण्यात आल्या. आदित्य-एल१ वरील मुख्य पेलोड्सपैकी एक असलेल्या ‘सूट’मुळे सूर्यापासून जवळच्या-अतिनील किरणोत्सर्गाची उत्पत्ती, भिन्नता आणि सौरज्वालांसारख्या उच्च ऊर्जा स्फोटांबद्दल नवीन माहिती मिळेल. उपकरणाच्या हार्डवेअरसाठी इस्रोकडून आयुकाला २५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.

horiba India Hydrogen vehicle
चाकणमध्ये हायड्रोजन वाहन इंजिन चाचणी सुविधा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Toyota camry sedan launched in india comes with 9 airbags safety features know its price, performance and mileage
स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
drone spray services for farmers drone spraying pesticides for agriculture
कृषी ड्रोन : अर्थार्जनाचा नवीन मार्ग
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
CCTV installation completed two years ago but not fully utilized in the city
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काम अपूर्णच, ६० कोटी रुपयांचे देयक महापालिकेने रोखले
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…

हेही वाचा… मुळशी तालुक्यातील ‘हे’ गाव होणार कार्बनमुक्त

प्रा. त्रिपाठी म्हणाले, की प्रकाशाच्या २०० ते ४०० नॅनोमीटर तरंगलांबी श्रेणीतील एक दुर्बीण आहे. त्याद्वारे सूर्याच्या संपूर्ण कड्याची (डिस्क) प्रतिमा मिळेल. सूर्याच्या वातावरणातील महत्त्वपूर्ण निरीक्षणाची क्षमता या उपकरणात आहे. आतापर्यंत संपूर्ण तरंगलांबी श्रेणीतील पूर्ण डिस्क प्रतिमा कधीही प्राप्त झाल्या नाहीत. सौरज्वाला आणि चुंबकीकृत प्लाझ्माच्या उद्रेकामुळे दिशानिर्देशन उपग्रह आणि मानवी अंतराळ उड्डाणावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा अभ्यास या मोहिमेच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे सूर्याच्या पृष्ठभागाबरोबरच सौरज्वालांच्या अभ्यासासाठी सूटची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन आणि ऑक्सिजन पातळी नियंत्रित करण्यातील सूर्याची भूमिका स्पष्ट होईल. सूर्यकिरणातील त्वचेच्या कर्करोगासाठी घातक अतिनील विकिरण मोजणे शक्य होईल.

हेही वाचा… ससूनमध्ये ‘कोड ब्ल्यू’! आपत्कालीन स्थितीत केवळ १२० सेकंदांत उपचार

‘सूट’ हे उपकरण ४५ किलोचे आहे. सूर्याविषयीच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्याबरोबरच अतिनील तरंगलांबीतील अद्ययावत निरीक्षण ‘सूट’मुळे प्राप्त होणार आहे. सूर्याच्या अतिनील किरणांचा अभ्यास करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होणार आहे, असे प्रा. रामप्रकाश यांनी सांगितले.

हेही वाचा… पिंपरी-चिंचवडवर आणखी पाणी कपातीची टांगती तलवार, पवना धरणात एवढेच पाणी शिल्लक

आदित्य मोहिमेचे लाँचिंग ऑगस्टमध्ये करण्यात येणार आहे. पृथ्वी आणि सूर्याच्या स्थितीनुसार उपग्रह अवकाशात सोडणे आवश्यक आहे. ऑगस्टमध्ये संधी हुकल्यास डिसेंबरपर्यंत थांबावे लागेल. त्यामुळे ऑगस्टमध्येच उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे रामप्रकाश यांनी सांगितले.

Story img Loader