लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : अवघ्या काही महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी भारतीय जनता पक्षाकडून सुरू करण्यात आली आहे. लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी विविध नेत्यांकडे सोपवून त्याचे सूक्ष्म निरीक्षण करण्याचे नियोजन भाजपने सुरू केले आहे. पुणे लोकसभा मतदार संघात समावेश होत असलेल्या सहा विधानसभा मतदार संघांची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आली आहे.

Maharashtra assembly election 2024
लालकिल्ला: शेवटच्या आठवड्यातील प्रचाराने लाभ कोणाला?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
yogi Adityanath told mahavikas aghadi problem
काँग्रेस आघाडी ‘समस्या’; तर भाजपा महायुती ‘समाधान’ – योगी आदित्यनाथ
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
Dr Sachin Pavde become X factor against MLA Dr Pankaj Bhoir and Shekhar Shende
डॉ. सचिन पावडे ठरताहेत ‘ एक्स ‘ फॅक्टर, आघाडी व युतीस धास्ती.
Sharad Pawar on Gautam Adani meeting
Sharad Pawar: “होय, बैठक झाली होती, पण…”, NCP-BJP एकत्र येण्यासाठी अदाणींच्या घरी बैठक; अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले…
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई

पुण्यातील तीन मतदार संघाची जबाबदारी माजी मंत्री आणि विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे पक्षाने दिली आहे. यामध्ये वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे वडगावशेरी मतदार संघाचे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मुळीक इच्छुक असून ते विशेष प्रयत्नशील आहेत. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मुळीक यांचा पराभव झाला होता.

आणखी वाचा-गणेशोत्सवात सडक सख्याहरींना चाप, सडक सख्याहरींची छायाचित्रे चौकात लावणार; पोलीस आयुक्तांचा इशारा

वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस चे सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार असून ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आहेत. आगामी विधानसभा निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय राज्यात सत्ताधारी असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतला आहे. त्यानुसार जागांची वाटप केले जाणार आहे. मतदारसंघांमध्ये ज्या पक्षाचा विद्यमान आमदार असेल ती जागा संबंधित पक्षाला सोडली जाईल अशी प्राथमिक चर्चा महायुतीच्या नेत्यांमध्ये झालेली आहे. या सूत्रानुसार जागावाटप झाल्यास वडगावशेरी मधून टिंगरे यांना संधी मिळू शकते.

वडगावशेरीमधून उमेदवारी मिळावी यासाठी माजी आमदार आणि भाजपाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक प्रयत्नशील आहेत. लोकसभेच्या उमेदवारीसाठी देखील त्यांनी जोर लावला होता. उमेदवारी जाहीर होण्याच्या आल्या दिवसापर्यंत मुरली मोहोळ यांच्या बरोबरच जगदीश मुळीक यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मुळीक यांनी या काळात शहरातील विविध भागात मोठ मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करून चांगली चुरस निर्माण केली होती. भाजपाने मोहोळ यांना उमेदवारी दिल्यानंतर दोन दिवसात नाराजी विसरून मुळीक त्यांच्या प्रचारात सहभागी देखील झाले होते. पक्षाकडून त्यांना पुढील काळात संधी देण्याचा शब्द दिल्याने आपली नाराजी बाजूला ठेवत ते प्रचारात उतरल्याची चर्चा होती.

आणखी वाचा-अवाजवी अनामत शुल्काला चाप; कमाल मर्यादा एफआरएकडून निश्चित

भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जगदीश मुळीक यांचे घनिष्ठ संबंध आहेत. विधानसभेसाठी तुमच्या नावाचा विचार करू असा शब्द त्यांना देण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता भाजपाच्या वतीने विधानसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आलेल्या मतदार संघामध्ये वडगावशेरीचा समावेश करण्यात आला आहे. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे शिवाजीनगर, कोथरूड या मतदार संघासह वडगावशेरी मतदार संघाची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे जगदीश मुळीक यांच्या आशा उंचाविल्या आहेत.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे गेल्या काही महिन्यांपासून एका प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपींना वाचविण्यासाठी आमदार टिंगरे यांनी पोलीस यंत्रणेवर दबाव आणल्याचा आरोप त्यांच्यावर होता. हे प्रकरण चांगलेच गाजल्याने आमदार टिंगरे काही प्रमाणात बॅकफुटला गेले आहेत. त्यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून ही जागा लढविण्यास त्यांना अडचण होऊ शकते, अशी काही चर्चा सुरू झाली आहे. याचा फायदा घेत. वडगावशेरी ची जागा भाजपाला द्यावी यासाठी मुळीक यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महायुतीत हा मतदारसंघ कोणाला सुटणार, यावरून तर्कवितर्क सुरू आहेत. त्यातच भाजपने वडगावशेरीची जबाबदारी पंकजा मुंडे यांना दिल्याने हा मतदार संघ महायुतीत चुरशीचा झाला आहे.