अकरा वर्षांच्या मुलीला पळवून नेत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १५ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
चांद जमाल शेख (वय २०, रा. पानसरे चौक, आनंदनगर, चिंचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शौचालयास गेली असता शेख याने मुलीच्या तोंडाला फडके बांधून जिवे मारण्याची धमकी देत लहुजी वास्ताद व्यायाम शाळेच्या बाजूच्या पडक्या घरात नेले. या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. याप्रकाराची माहिती मुलीने आईला दिल्यानंतर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख याच्याविरुद्ध बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलामांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक केली असून सहायक पोलीस आयुक्त सुधीर चौगुले अधिक तपास करत आहेत.

Story img Loader