लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: एकतर्फी प्रेमातून कारागृहातील शिपाई महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अधिकारी योगेश भास्करराव पाटील (वय ५२, रा. जेलर बंगला, जेल वसाहत, कोल्हापूर) याला अटक केली आहे. याबाबत एका ३९ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कारागृह शिपाई म्हणून काम करतात. आरोपी योगेश पाटील याच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. पाटील हा फिर्यादी यांना वारंवार दूरध्वनी करुन गुन्हा मागे घेण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा… पुण्यातील धरणांमध्ये ९१ टक्के पाणीसाठा; पानशेत धरण १०० टक्के भरले

मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, असे त्याने सांगितले होते. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास महिला कामावरुन घरी येत होती. त्याने तिला गाठले. मला माहिती आहे तू भाड्याच्या घरात राहतेस. माझ्याबरोबर शांत चल, असे त्याने तिला सांगितले. पाटील तिच्या घरी आला. घरातील वॉशिग मशीन घेऊन गेला. काही वेळाने परत आला. त्याच्या हातात प्लॅस्टिकचे बाटलीत पेट्रोल होते. तू माझी झाली नाही तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही, असे म्हणून तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला. त्याला धक्का देऊन ती आतील खोलीत जाऊन लपली. पोलिसांनी पाटील याला अटक केली असून पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jailer arrested in attempt to burn a prison woman constable alive in pune print news rbk 25 dvr