” राज्यपाल भगतसिंह कोशारी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य करत होते. तसेच, कोश्यारी यांची महाराष्ट्रविरोधी भूमिका होती. त्यांना बदलावे अशी मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्यांचा भाजपाने कधी निषेध केला नाही. महात्मा ज्योतिराव फुलेंचा अपमान केला तरी भाजपा गप्प होती. त्यांना हा अवमान कदाचित मान्य असेल”, अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मान्य केल्यानंतर जयंत पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी एक दिलाने निवडणुकीत उतरले आहेत. नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र आल्याने सहज विजय झाला, हे आपण सर्वांनी बघितले आहे. नागरिक भाजपाविरोधी असून महाविकास आघाडीला विजयी करत आहेत. हे चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेले आहे. त्याची पुनरावृत्ती पुण्यातील कसब्यात आणि चिंचवडमध्ये होणार, असा विश्वास राष्ट्रवादी पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच, बंडखोरीचा या निवडणुकीवर परिणाम होणार नाही. खरी लढत महाविकास आघाडीविरुद्ध भाजपा अशी आहे. बंडखोरीमुळे (राहुल कलाटे) नाना काटे यांचा विजय होईल, असे ते म्हणाले.
राज्यात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होईल. राज्यपालांनी जो छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे हृदयात किती महत्वाचे स्थान आहे, हे महाराष्ट्र दाखवून देईल. शिवजयंती मोठी साजरी होईल, असेही जयंत पाटील म्हणाले.