पिंपरी : काहीजण संकटात गेल्यामुळे अडचणीत गेले.अडचणीत गेल्यामुळे वळचणीला जाऊन बसावे लागले. ही परिस्थिती आहे. परिस्थिती कायम राहत नसते. परिस्थिती बदलत असते असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर जोरदार हल्ला केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरीतील एका कार्यक्रमात बोलताना पाटील म्हणाले, आमच्या पक्षातील काही लोक तिकडे गेले आहेत. काहीजण संकटात गेल्यामुळे अडचणीत गेले.अडचणीत गेल्यामुळे वळचणीला जाऊन बसावे लागले ही परिस्थिती आहे. परिस्थिती कायम राहत नसते. परिस्थिती बदलत असते. यापुढे बुद्धिमान मतदार सुजाणपणाने वाटचाल करेल. कोणाच्या मागे जाऊन थांबायचे याचा योग्य निर्णय घेण्याचे काम या देशातील जनता करत असते. आता निवडणूक विकासावर नाही तर विचारावर होणार आहे. तुम्ही कोणत्या विचारांच्या मागे आहेत हे पाहून लोक मतदान करतील.

हेही वाचा >>>निवडणूक आयोगामोर सुनावणी सुरू असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मोठे विधान म्हणाले, “अदृश्य शक्ती…”

आता पक्षाची चोरी होत आहे. शिवसेनेची चोरी झाली. आता आमच्या पक्षाची चोरी होऊ नये. पक्ष, चिन्ह काढून घेण्याचे मनसुबे आहेत. आता खुर्चीत बसलेला निर्णय देत नाही. दुसराच कोण तरी निर्णय लिहून देतो आणि तो खुर्चीतील व्यक्ती वाचून दाखवतो. त्यामुळे आता चिन्ह, पक्ष न बघता लोक विचार बघून मते करतील, असेही पाटील म्हणाले.निवडणूक आयोगामोर सुनावणी सुरू असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मोठे विधान म्हणाले, “अदृश्य शक्ती…”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil criticizes ajit pawar group pune print news ggy 03 amy
Show comments