पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिसंवाद मेळावा प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. महापालिका निवडणुकीत आघाडी बाबत आधी उपमुख्यमंत्री आणि शहराध्यक्ष यांच्याशी चर्चा करेन, त्यानंतर बोलेन, असं ते म्हणाले.

यूक्रेनमध्ये अडकेल्या विद्यार्थ्यांबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “अनेक पालक आणि मुलांशी बोलणं सुरू आहे. दुर्दैवाने एकाच मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने या मुलांना वाचवण्यास उशीर केला आहे. केंद्र सरकारने मुलांना लवकरात लवकर मायदेशी आणण्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे,” असं त्यांनी सांगितलं.

“राज्य सरकार दाऊदचे समर्थन…;” सरकारच्या ‘त्या’ भूमिकेवरून चंद्रकांत पाटलांचा आरोप

यावेळी नवाब मलिकांच्या राजीनाम्या बाबतही पाटलांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, “आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही. रोज उठून मंत्र्यांमागे चौकशी लावली की आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ असं नाही. अनिल देशमुखांबाबत जे घडलं नाही, ते दाखवायचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा राजीनामा घेतला. परंतु आता आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही. तसेच किरीट सोमय्यांबाबत न बोललेलंच बरं,” असंही ते म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानाबद्दल ते म्हणाले की, “महाराष्ट्राचा इतिहास सर्वांना माहिती आहे. औरंगाबाद कोर्टाने देखील निर्णय दिला आहे. त्यामुळे जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने अशा गोष्टी बोलणं टाळायला हवं, अशी वक्तव्ये करणं योग्य नाही,” असं जयंत पाटील म्हणाले.

ही राजकारण करण्याची वेळ नाही – सुप्रिया सुळे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सातत्याने आम्ही सगळे केंद्र सरकारकडे विनंती करीत आहोत. युक्रेनमध्ये अनेकांची मुले अडकली आहेत, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावे. शरद पवार यांनी देखील मंत्र्यांशी आणि संबधीत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. ती आपली मुलं आहेत. त्यांना परत आणण्यासाठी पूर्ण ताकदीने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. दुर्दैवाने आपण भारताचा एक मुलगा गमावून बसलो आहे. ती घटना अतिशय दु:खद आणि मनाला वेदना देणारी आहे. त्यामुळे माझी केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे की, परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आपल्या मुलांना वाचवा, मग पब्लिसीटी करा, ही पब्लिसीटी आणि राजकारण करण्याची वेळ नाही.