लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रवेशांसाठी घेतली जाणारी जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा २६ मे रोजी जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा दोन सत्रांत होणार आहे. या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी २१ ते ३० एप्रिलची मुदत देण्यात आली आहे.
जेईई ॲडव्हान्स्डचे वेळापत्रक आयआयटी मद्रासतर्फे जाहीर करण्यात आले. त्यानुसार परीक्षा २६ मे रोजी दोन सत्रात घेतली जाणार आहे. पेपर एक सकाळी नऊ ते दुपारी बारा, तर पेपर दोन दुपारी अडीच ते साडेपाच या वेळेत होणार आहे. नोंदणीकृत उमेदवारांनी फी भरण्याची अंतिम तारीख ६ मे २०२४ आहे. तर प्रवेशपत्र १७ मे रोजी उपलब्ध करून दिले जाणार आहे. परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आणि निकाल ९ जूनला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
आणखी वाचा-… म्हणून माझा अभिनयाकडे प्रवास, अभिनेते- दिग्दर्शक सौरभ शुक्ला यांची फिरकी
आर्किटेक्चर ॲप्टिट्यूड टेस्टसाठी (एएटी) ऑनलाइन नोंदणी ९ जूनपासून सुरू होणार आहे. एएटी परीक्षा १२ जून रोजी सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत एकाच सत्रात घेतली जाणार आहे. या परीक्षेचा निकाल १५ जूनला जाहीर होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. अधिक माहिती HYPERLINK “http://www.jeeadv.ac.in/”www.jeeadv.ac.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.