राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशांसाठीच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार जानेवारी आणि एप्रिलमध्ये संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (जेईई मेन्स), वैद्यकीय प्रवेशांसाठीची नीट परीक्षा ७ मे, विद्यापीठ प्रवेशांसाठीची केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूईटी) २१ ते २३ मे रोजी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- कनिष्ठ महाविद्यालय तुकडीवाढीचे अधिकार राज्य शासनाकडे; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

एनटीएने नोंदणीची आणि परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. एनटीएतर्फे विविध प्रवेश परीक्षांची प्रक्रिया राष्ट्रीय पातळीवर राबवली जाते. गेली दोन वर्षे करोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले होते. त्याचा परिणाम प्रवेश प्रक्रिया आणि शैक्षणिक कामकाजावरही झाला होता.

एनटीएने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक आता पूर्वपदावर आल्याचे दिसून येत आहे. जेईई मेन्सच्या पहिल्या सत्राची परीक्षा परीक्षेचे पहिले सत्र २४, २५, २७, २८, २९ आणि ३० जानेवारी, दुसऱ्या सत्राची परीक्षा ६. ८, १०, ११ आणि १२ एप्रिल रोजी होईल. राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (नीट) ७ मे रोजी, तर विद्यापीठ प्रवेशांसाठीची केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूईटी) २१ ते २३ मे रोजी होणार आहे. एनटीएने परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केल्याने आता विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी तयारी अधिक कसून करावी लागणार आहे.

हेही वाचा- पुण्याच्या पाणी वापराबाबत तक्रार करू नका! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे जलसंपदा विभागाला आदेश

जेईई मेन्सची नोंदणी सुरू

परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर एनटीएने जेईई मेन्स या परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात झाली. अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत १२ जानेवारी आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज आणि परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. एकूण तेरा भारतीय भाषांमध्ये आणि ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येईल.

TOPICSनीट
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jee mains neet exam schedule announced pune print news dpj