पुणे : अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वास्तुकला अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्यच्या (जेईई मेन्स) पहिल्या सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार २२ ते २४, २८ आणि २९ जानेवारी रोजी पेपर २ होणार आहे, तर ३० जानेवारी रोजी पेपर २ होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. देशभरातील आणि परदेशातील एकूण १५ शहरांतील परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदवी (बीई, बीटेक) अभ्यासक्रमांसाठी जेईई मुख्यमधील पेपर १ सकाळी नऊ ते बारा, दुपारी तीन ते सहा अशा दोन सत्रांत होणार आहे. तर, वास्तुकला पदवी (बीआर्क) आणि नियोजन पदवी (बीप्लॅनिंग) अभ्यासक्रमांची परीक्षा एकाच सत्रात घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी इंग्रजी, हिंदी, मराठीसह विविध भाषांचे पर्याय देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना अधिकृत प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. परीक्षेबाबतची अधिक माहिती https://jeemain.nta.nic.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jee mains session 1 schedule announced pune print news ccp 14 amy