भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ, ज्येष्ठ निसर्ग लेखक मारूती चित्तमपल्ली, पुण्यनगरीचे संस्थापक मुरलीधर शिंगोटे, हिवरे बाझारचे सरपंच पोपटराव पवार, ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना जाहीर झाला असून, येत्या २६ तारखेला कात्रज येथील भारती विद्यापीठाच्या आवारात ज्येष्ठ विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते त्यांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विद्यापीठाच्या स्थापनादिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यात येते. प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम आणि कार्यवाह डॉ. विश्वजित कदम कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा