जीवनसाथी डॉट कॉमवर प्रोफाइल तयार करून व्यवसायाने वकील असल्याचे खोटे सांगत एका महिलेशी विवाह करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल राजेंद्र चौहान (रा. नेताजीनगर, गुजरात) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पद्मासिंह अमित चौहान यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल याने जीवनसाथी डॉट कॉमवर प्रोफाइल तयार केली. त्यावर व्यवसायाने वकील असून स्कॉट मार्केटमध्ये महिन्याला चाळीस ते पन्नास हजार रुपये उत्पन्न असल्याची माहिती दिली. पद्मा यांची या संकेतस्थावर माहिती काढत पुणे येथे घरी आले. पद्मा यांना विवाहाची मागणी घातली. त्यांच्या वडिलांना भेटले. त्यानंतर त्या दोघांचा विवाह झाला आणि ते गुजरात येथे गेल्यावर त्यांना त्यांची दिलेली सर्व माहिती खोटी असल्याचे आढळून आले. म्हणून त्यांनी विशालच्या विरुद्ध फसवणुकीची तक्रार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा